Virat Kohli : लेकीसोबत कोहली झाला कूल!

अनिरुद्ध संकपाळ

फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासूनच कडक कामगिरीचा धडाका सुरू केला आहे.

आरसीबीचा किंग विराट कोहली मुंबई विरूद्धच्या सामन्यात 82 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

मात्र त्याला कोलकात्याविरूद्धच्या सामन्यात फक्त 21 धावा करता आल्या.

फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीने पुढच्या लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या सामन्यात 44 चेंडूत 61 धावा चोपल्या. मात्र त्याची ही खेळी आरसीबीला विजय मिळवून देऊ शकली नाही. आरसीबीने सामना 1 विकेटने गमावला.

विराट कोहलीने तीन सामन्यात 164 धावा ठोकत हंगामाची धडाकेबाज सुरूवात केली.

या धडाकेबाज सुरूवातीनंतर विराट कोहलीने आपली कन्या वामिकासोबत पूल पार्टीचा आनंद लुटला. सध्या सोशल मीडियावर विराटचा आणि वामिकाचा स्विमिंगपूलमधील पाठमोरा फोटो व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.