IPLच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये MS धोनी आहे तरी कुठे?

Kiran Mahanavar

विराट कोहली

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्याने 251 सामने खेळले असून 7971 धावा केल्या आहेत.

शिखर धवन

पंजाब किंग्जचा शिखर धवन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 222 सामने खेळले असून एकूण 6769 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

या बाबतीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये 257 सामने खेळून 6628 धावा केल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 184 सामने खेळून IPL मध्ये 6565 धावा केल्या आहेत. टॉप 5 मध्ये तो एकमेव परदेशी खेळाडू आहे

सुरेश रैना

या यादीत सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे, जो आता निवृत्त झाला आहे. त्याने आयपीएलमध्ये 205 सामने खेळून 5528 धावा केल्या आहेत.

एमएस धोनी

या यादीत एमएस धोनी आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याने आयपीएलमध्ये 264 सामने खेळून 5243 धावा केल्या आहेत.

एबी डिव्हिलियर्स

आरसीबीकडून खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने 184 सामन्यांमध्ये 5162 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.