गौती भाईनं मिठी मारल्यानं... विराटनं कोणाला काढला चिमटा?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल 2024 मधील सर्वात हायलायटेड क्षण म्हणजे गौतम गंभीरनं विराट कोहलीला मैदानावर मिठी मारणं!

गेल्या हंगामात लखनौचा मेंटॉर असताना गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला होता. त्यानंतर गंभीर प्रचंड ट्रोल झाला होता.

यानंतर यंदाच्या हंगामात त्याचा पुढचा अंक पहायला मिळणार का असं वाटत होतं. आता केकेआरचा मेंटॉर झालेल्या गंभीरनं देखील आरसीबीविरूद्ध नेहमीप्रमाणं बेधडक विधान केलं होतं.

मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीर हे मैदानावर एकमेकांना मिठी मारताना दिसले. याबाबत विराट कोहलीला विचारणा झाली.

त्यावेळी विराट कोहलीने चाहत्यांचीच खेचण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, मी नवीन उल हकला आणि गौती भाईने मला मिठी मारल्यानं लोकांची निराशा झाली. तुमचा मसाला संपून गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.