Visa Free Countries: ९ असे देश जे भारतीय पासपोर्ट-धारक २०२३ मध्ये व्हिसा शिवाय पाहू शकतात

Swapnil Kakad

बार्बाडोस

ज्वेल ऑफ कॅरेबियन अशी ओळख असलेल्या बार्बाडोसमधील काही बीच जगातील सर्वात सुंदर बीचपैकी एक आहेत. पूर्व पुष्टीकारानंतर भारतीयांना आगमनावर व्हिसा मिळतो.

Barbados

डॉमिनिका

ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट असलेल्या सुंदर कॅरेबियन आयर्लंडमध्ये भारतीय पासपोर्टधारक ९० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

Dominica

जमैका

'झऱ्यांची जमीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या देशामध्ये भारतीय अनेक एक्झॉटिक ठिकाणे व्हिसाशिवाय पाहू शकतात.

Jamaica

मोन्त्सेरात

कॅरेबियनचे पन्ना बेट म्हणून ओळख असलेल्या आणि ज्वालामुखीय प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या यूके मधील प्रदेशाला भारतीय व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात.

मोन्त्सेरात

कूक आयर्लंड्स

न्यू झीलंडचे सुंदर स्वशासित पॅसिफिक महासागरातील हे आयर्लंड सुंदर बीच, उष्ण हवामान, आणि आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध आहे. ह्या देशात ३० दिवसांपर्यंत भारतीय व्हिसाशिवाय राहू शकतात.

Cook Ireland

मौरिशस

हिंद महासागरातील हा आयर्लंड देश येथील सुंदर बीच, सरोवरे, आणि खडकाळ प्रदेशासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही केवळ फिरण्यासाठी मौरिशसला जात असाल तर विना-व्हिसा तुम्ही ६० दिवस इथे राहू शकता.

Mauritius

मकाउ

चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरील हा देश येथील भव्य कॅसिनो आणि मॉल्समुळे 'आशियाचे लास वेगास' म्हणून प्रसिद्ध आहे. ३० दिवसांपेक्षा कमी काळ ह्या देशात फिरण्यासाठी भारतीयांना व्हिसा लागत नाही.

macao

हैती

हैती हा आणखी एक कॅरेबियन देश आहे जिथे फिरण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही.

Haiti

त्रिनिदाद आणि टोबॅगो

व्हेनेझुएलाजवळील हे कॅरेबियन देश व्हाईट सॅण्ड बीच, वॉटर स्पोर्ट्स, विस्तृत गोल्फ कोर्ससाठी प्रसिद्ध आहेत. ह्या देशात भारतीय ९० दिवस व्हिसाशिवाय राहू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trinidad and Tobago