Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात साखर अस्तित्वात होती का, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो
Was there sugar in Maharashtra during Chhatrapati Shivaji Maharaj period
आनंदाच्या प्रसंगी साखर वाटण्याची आपली परंपरा आहे
सतराव्या शतकात जिजाऊंचा जन्म झाला, तेव्हा त्यांच्या वडील लखुजीराव जाधव यांनी आनंदोत्सव साजरा करत हत्तीवरून साखर वाटली होती.
पण इंग्रज आल्यानंतरच आपल्याला चहा आणि साखर यांची सवय लागली, त्यामुळे सतराव्या शतकात साखर कुठून आली, असा प्रश्न निर्माण होतो
आश्चर्य वाटेल, पण साखरेचा शोध इंग्रजांनी नाही, तर आपल्या भारतीय पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच लावला होता!
ईशान्य भारतातील सुपीक खोऱ्यांमध्ये आणि दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटांमध्ये उसाचे उत्पादन सर्वप्रथम झाले असावे, असे मानले जाते.
भारतातील ऊस इ. स. पू. १८०० ते १७०० या कालावधीत चीनमध्ये गेला होता.
उसाचा रस उकळून कच्ची साखर तयार करण्याची पद्धत गंगेच्या खोऱ्यातील लोकांनी शोधली, असे अनेक चिनी लेखकांनी नमूद केले आहे.
त्यानंतर अरबी पर्शियन लोक भारतीयांकडून साखरेचा उपयोग शिकले आणि त्यांनी भूमध्य समुद्र खोऱ्यात उसाची लागवड केली.
त्यानंतर पॅलेस्टाइनमधून युद्धातून परतलेल्या सैनिकांनी युरोपात साखर आणली, व्हेनीस शहर हे साखरेच्या व्यापाराचे केंद्र बनले होते.
पंधराव्या शतकाच्या प्रारंभात पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी ऊस अटलांटिक महासागराच्या पार नेला.
भारताने शोध लावलेली साखर आता जगभर पोहचली आहे. हुबळी येथील पहिला साखर कारखाना १७८४ साली सुरू करण्यात आला होता.
१७९१ साली भारताने ग्रेट ब्रिटनला ९६ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याचा उल्लेख आढळतो.
याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या काळातही साखर होती.
१८८२ साली पुण्याजवळच्या मांजरी येथे भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र सुरू झाले.
महाराष्ट्रातले शेतकरी ऊसाचे पीक घेत होते याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रात आढळतात.
पेशवाईच्या काळात जेवणानंतर पाहुण्यांना साखर दिली जात असे, लाडवात साखर घातली जात असे त्यांच्या दफ्तरावरून दिसते.