Weekly Horoscope : तरुणांचे प्रश्न सुटतील, पण निर्णय घेताना मात्र...

लेखक : श्रीराम भट

तरुणांचे प्रश्‍न सुटतील

अश्विनी सप्ताह एकूणच जीवनात जान आणणारा आहे. तरुणांचे प्रश्न सुटतील. सप्ताहात हाता-पायाच्या दुखापतींपासून जपा. ता. २८ चा शुक्रवार घरातील मोठ्या सुवार्तांचा.

Weekly Horoscope | esakal

ओळखी, मध्यस्थी फलदायी ठरतील

राशीतील शुक्रभ्रमण रोहिणी नक्षत्रास आर्थिक ओघ सुनिश्चित करेल. सप्ताहारंभ मोठ्या करारमदारांचा. तरुणांना विवाहस्थळं चालून येतील. ओळखी, मध्यस्थीतून मोठे फलदायी होणारे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उत्सव, समारंभ घडवेल.

Weekly Horoscope | esakal

भाजण्या-कापण्यापासून जपा

लाभस्थानातील गुरुभ्रमण मृग नक्षत्राच्या व्यक्तींना एक सुंदर पॅकेज बहाल करेल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठी ऊर्जा मिळेल. घरगुती वादापासून सांभाळावेत. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळाच्या हाय व्होल्टेजपासून त्रास. भाजण्या-कापण्यापासून जपा.

Weekly Horoscope | esakal

व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड मोडाल

पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात परिस्थितिजन्य मोठे लाभ अपेक्षित आहेत. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या जल्लोषाचा. व्यावसायिक प्राप्तीचं रेकॉर्ड मोडाल. आश्लेषा नक्षत्रास सरकारी पाठबळातून लाभ. घरातील तरुणांचा भाग्योदय.

Weekly Horoscope | esakal

यशाचा जल्लोष कराल

आपला मार्केटमधील शेअर वधारेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा आरंभ आणि शेवट पूर्णपणे बॅटिंगचं फिल्ड ठेवेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा आरंभ मोठ्या यशातून जल्लोषाचा. तरुणांना शिक्षण, नोकरी आणि विवाह आदी घटकांतून प्युअर सिक्वेन्स लागतील.

Weekly Horoscope | esakal

बदलीतून त्रासाची शक्यता

प्रेमात फसू नका. बाकी सप्ताहाची सुरुवात शुक्रभ्रमणातून स्वतंत्र व्यावसायिकांना मोठी लाभदायी. बँकांची कामं होतील. घरात विवाहकार्य ठरतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतल्या बदलीतून त्रास होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांना सांभाळा.

Weekly Horoscope | esakal

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

सप्ताहातील वक्री बुध आणि मंगळ भ्रमण राजकारणी आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना उपद्रवाचं. स्वतंत्र व्यावसायिकांना आरंभ आणि शेवट हुरूप आणणारा. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. सप्ताहाचा शेवट वैयक्तिक उत्सव प्रदर्शनाचा. उत्तम नोकरी मिळेल.

Weekly Horoscope | esakal

मानसिक संतुलन सांभाळावं

ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी मानसिक संतुलन सांभाळावं. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमण आरंभी आणि शेवटी वैवाहिक जीवनात छानच बोलेल. पती किंवा पत्नीचा मोठा भाग्योदय. गुरुपुष्यामृताचा दिवस भाग्यलक्षणी. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता लाभेल.

Weekly Horoscope | esakal

संयमानं वागावं

सप्ताहात नवविवाहितांनी घरात संयमाने वागावे. प्रेमिकांनी भान ठेवावं. बाकी मूळ नक्षत्रास सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभग्रहांच्या माध्यमातून ऐनवेळी रसद पुरवणारा. पूर्वाषाढा नक्षत्रास शनिवारची संध्याकाळ सुवार्तेतून प्रसन्न ठेवणारी, विवाहविषयक हालचाली.

Weekly Horoscope | esakal

मोठं संकट दूर होईल

व्यावसायिक मंडळी छान खुशीत राहतील. श्रवण नक्षत्रास सप्ताहात अतिशय सुंदर नैसर्गिक पाठबळ राहील. तरुणांना उत्तम नोकरी मिळेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा नैतिक विजय हस्तगत होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींचं शनिवारी एखादं मोठं संकट दूर होईल.

Weekly Horoscope | esakal

न्यायालयीन प्रकरणात यश

व्यावहारिक चातुर्यातून लाभ उठवाल. मात्र, सप्ताहात राजकारणी मंडळींनी सांभाळावे. होतकरू तरुणांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा दिलासा देईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणातून यश. कलाकारांना बहुमान मिळेल.

Weekly Horoscope | esakal

उत्तम नोकरी मिळेल

सतत आगत-स्वागत होईल आणि मनासारख्या घटना घडतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखी फलदायी ठरतील. घरातील तरुणांचे विवाह ठरवाल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृतावर एखादा मानाचा किताब मिळेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Horoscope | esakal