सकाळ डिजिटल टीम
Priya Paramita Paul : प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं. कधी आनंद तर कधी दु:ख. जे घडतं त्याला सामोरं मात्र जावं लागतं.
महिलांना जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो. कारण, त्यांना लग्नानंतर (Marriage) कसं कुटुंब मिळेल यावर बराचसा भाग अवलंबून असतो.
पण, अनेक जणी अशा असतात ज्या आपली स्वप्न काहीही झालं तर पूर्ण करतात.
असंच एक नाव आहे मिस वर्ल्ड इंटरनॅशनल अॅम्बॅसेडर (Ms World International Ambassador 2022) किताब जिंकणाऱ्या प्रियाचं!
प्रिया यांच्या पतीनी त्यांना सोडलं, त्यात नोकरी गेली आणि डिप्रेशनही आलं तरीही त्यांनी संघर्ष करून हा किताब पटकावला.
मुंबईत राहणाऱ्या प्रिया यांचं पूर्ण नाव प्रिया परमिता पॉल (Priya Paramita Paul) असं आहे.
सध्या त्या एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आणि लाईफ कोच म्हणून काम करतात. त्या मूळच्या आसामच्या आहेत.
प्रिया सांगतात, 'मी याआधी मिस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल, मिस वर्ल्ड पेटिट हे किताबही जिंकले आहेत.’
‘माझं 2016 मध्ये लग्न झालं. आमचं कुटुंब चांगलं होतं. पण, अचानक माझा नवरा दूर रहायला गेला आणि मला मेल करून त्यानी सांगितलं की मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.'
मी दोन वर्षं डिप्रेशनमध्ये होते, पण 2018 मध्ये मी घटस्फोट घेतला,’ असंही प्रिया यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.