धनश्री भावसार-बगाडे
धावपळीत पौष्टीक आहार घेतला जाईलच असं नाही. अशावेळी बदाम आणि वेलची आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतात.
बदाम हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत मानला जाते.
वेलची रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी, नियासिन, खनिज लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत मानली जाते.
बदाम आणि वेलची दोन्हीत कॅल्शियम भरपूर असल्याने याचे नियमित सेवन हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरू शकते.
यामुळे हृदयाशी संबंधीत समस्या दूर होतात. बदामातलं ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि वेलचीमधलं अँटी ऑक्सिडंट गुणधर्म हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
बदाम आणि वेलचीच मिश्रण पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. यात फायबरचे प्रमाण चांगले असते. पचनाच्या समस्या दूर होतात.
बदामातील व्हिटॅमिन ई आणि वेलचीमधील सी दोन्ही त्वचेसाठी उत्तम असतात. त्यामुळेच याचे मिश्रण खाल्ल्याने त्वचा चांगली होते.
या मिश्रणाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. पचनक्रिया सुरळीत होत असल्याने वजन कमी होते. पोट भरल्यासारखे वाटल्याने भूकपण कमी लागते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.