लाल, पिवळी, निळी...; नंबरप्लेटच्या रंगांचे अर्थ काय?

वैष्णवी कारंजकर

महामार्ग किंवा मेट्रो सिटींमध्ये विविध प्रकारच्या, रंगाच्या नंबर प्लेट असलेली वाहने नजरेस पडतात.

Numebr Plates | Sakal

पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट बहुतांश दिसत असल्या, तरी आता इतर नंबर प्लेट असलेली वाहने दिसतात. जाणून घ्या नंबर प्लेट्सच्या रंगाचं रहस्य

Number Plates | Sakal

पांढरा

काळ्या अक्षरांसह पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट बहुतांश वाहनांना असतात. या नंबर प्लेट खासगी किंवा घरगुती वापराच्या वाहनांसाठी असतात. अशा वाहनांचा आपण कमर्शिअल अर्थात व्यावसायिक, प्रवासी वाहतुकीसाठी वापर करू शकत नाही.

Number Plates | Sakal

पिवळी

पांढऱ्याप्रमाणे पिवळ्या नंबर प्लेटवरही काळी अक्षरे असतात. अशा पिवळ्या नंबर प्लेटची नोंदणी केलेली वाहने केवळ व्यावसायिक वापराच्या अर्थात सामान किंवा प्रवासी वाहतुकीसाठी असतात. त्यासाठी संबंधित वाहनचालकाकडे व्यावसायिक वाहन परवाना आवश्यक असतो. प्रवासी वाहतुकीस प्रतिबंध असतो.

Number Plates | Sakal

हिरवी

काही वर्षांपूर्वी केवळ पांढऱ्या आणि पिवळ्या नंबर प्लेट असलेली वाहने रस्त्यावर होती. त्यात आता बऱ्यापैकी हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली वाहने दिसतात; तर ही वाहने इलेक्ट्रिक असतात. ही नंबर प्लेट इलेक्ट्रिक वाहनांना खासगी, व्यावसायिक किंवा प्रवासी वाहतुकीसाठीही वापरता येते.

Number Plate | Sakal

लाल

नवीन वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात लाल रंगाची नंबर प्लेट आरटीओकडून मिळते, ज्यावर पांढरी अक्षरे असतात. यामध्ये पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेटसह लाल अक्षरांचाही पर्याय असतो. कायमस्वरूपी नोंदणी होईपर्यंत केवळ एका महिन्याच्या वैधतेसाठी ही नंबर प्लेट वापरली जाऊ शकते.

Number Plate | Sakal

निळी

परदेशी व्यक्तींसाठी राखीव असलेल्या वाहनांना संबंधित प्राधिकरणा-कडून भारतात प्रवास करण्यासाठी पांढरी अक्षरे असलेली निळ्या रंगाची नंबर प्लेट दिली जाते. या प्लेटवर राज्यांचा कोड नसतो; तर डीसी (डिप्लोमॅटिक कॉर्प्स), सीसी (कॉन्सुलर कॉर्प्स), यूएन (युनायटेड नेशन्स) आदी अक्षरे असतात.

Number Plates | Sakal

काळी

लक्झरीयस हॉटेल किंवा रिसॉर्ट्समध्ये काळ्या रंगातील पिवळी अक्षरे असलेली नंबर प्लेट असलेली वाहने पाहुण्यांच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. अशी वाहने व्यावसायिक वापरासाठीही वापरता येतात.

Number Plates | Sakal

वरील दिशेला बाण दर्शवणारी

लष्करी वाहनांच्या नंबर प्लेटवर वरील दिशेला बाण दर्शवलेले असतात. ही नंबर प्लेट संरक्षण मंत्रालयातर्फे नोंदणी केलेली असते. बाणानंतरचे अंक वाहन नोंदणीचे वर्ष दर्शवते. त्यानंतर बेस कोड, अनुक्रमांक येतो. तर शेवटचे अंक वाहन वर्ग निर्देशित करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Number Plates | Sakal