भारतात पहिल्यांदा फटाके कधी आले? जाणून घ्या रंजक इतिहास

Amit Ujagare (अमित उजागरे)

फटाक्यांचा शोध

वाईट शक्तींना दूर पळवण्यासाठी चीनमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरु झाल्याचं सांगितलं जातं. चीनच्या अनेक शोधांमध्ये शोभेच्या दारुचा शोध महत्वाचा मानला जातो.

Firecrackers

आतषबाजीची सुरुवात

रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीला सर्वांत आधी १८३० मध्ये युरोपात सुरुवात झाली.

Firecrackers

लखलखणारी आतषबाजी

तसेच आकाशात लखलखणाऱ्या आतषबाजीला २० व्या शतकात सुरुवात झाली.

Firecrackers

फटाक्यांची आवड

फटाके उडवण्याची आवड लोकांना पूर्वीपासून होती. पण चीनमध्ये कायम पर्यावरणपूरक फटाके उडवले जात होते.

Firecrackers

रासायनिक पदार्थ

आजच्या फटाक्यांमध्ये नायट्रेट, सल्फर, पोटॅशिअमसारख्या विषारी रासायनिक पदार्थांपासून फटाके बनवले जातात.

Firecrackers

फटाके नाव कसं पडलं?

19 व्या शतकात मातीच्या एका छोट्याशा गाडग्यात दारु भरुन फटाके तयार केले जायचे. तसेच हे फटाके जमिनीवर आपटून फोडले जायचे.

Firecrackers

गाडग्यातले फटाके

गाडग्यातले फटाके जमिनीवर फोडल्यानंतर त्याचा फट् असा आवाज व्हायचा त्यावरुन याचं नाव फटाके असं पडल्याचं सांगितलं जातं.

Firecrackers

भारतात कसे आले?

इतिहासकारांच्या माहितीनुसार, पानिपतच्या पहिल्या युद्धात सन १५२६ मध्ये मुघलांनी दारुचा वापर केला होता. तेव्हापासूनच भारतात या दारुचा आणि पर्यायानं फटाक्यांचा वापर सुरु झाला.

Firecrackers

राजेशाही थाट

त्यानंतर हळूहळू लग्न समारंभ, शुभकार्यांमध्ये फटाके उडवण्याची प्रथा सुरु झाली. पण हे फटाके महागडे असल्यानं ते केवळ श्रीमतांच्या घरीच उडवले जायचे.

Firecrackers

देशातील पहिली फॅक्टरी

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात पहिल्यांदाच १९०० मध्ये कोलकात्यात फटाक्यांची फॅक्टरी सुरु केली.

Firecrackers

सर्वाधिक उत्पादन

जगात फटाके उत्पादनात भारताचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो. सध्या भारतात सर्वाधिक फटाके तामिळनाडूच्या शिवकाशी इथं तयार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firecrackers