कोण आहेत बाबा बोखनाग? उत्तरकाशी बोगद्याबाहेर केली जातीय पूजा

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले ४१ मजूर काल १७ दिवसांनंतर बोगद्यातून बाहेर आले.

baba baukhnag | Esakal

मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मजूरांच्या घरातील लोक आणि इतर नागरीक आभार मानत आहेत.

baba baukhnag | Esakal

त्यासोबतच ते बाबा बोखनाग यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, बाबा बोखनाग यांनी इतके दिवस बोगद्यातील कामगारांचे संरक्षण केले आणि त्यांच्या कृपेनेच कामगार बाहेर येणार आहेत.

baba baukhnag | Esakal

सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व मजूरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्यात अडथळे येत असतांना उत्तरकाशीतील लोकांनी याला दैवी कोप म्हटले.

baba baukhnag | Esakal

बाबा बोखनाग यांच्यामुळे ही दुर्घटना घडली आणि त्यांच्या कृपेनेच कामगार बाहेर पडतील असे सांगितले.

baba baukhnag | Esakal

मदत कार्य आणि विश्वास

स्थानिक लोकांमध्ये बाबा बोखनागचा उल्लेख मदत पथकापर्यंत पोहोचला. हा बोगदा बांधण्यासाठी बाबा बोखनागचे मंदिर पाडण्यात आले असून, हे मंदिर जोपर्यंत बांधले जात नाही, तोपर्यंत कामगारांना बाहेर पडणे कठीण होईल, असा दावा लोक करत होते.

baba baukhnag | Esakal

यानंतर बोगद्याच्या तोंडावर बाबा बोखनागच्या मंदिराची स्थापना करून त्यामध्ये पूजा सुरू झाली. मंगळवारी मदत पथक कामगारांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली.

baba baukhnag | Esakal

त्याआधी मदतकार्याचे नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्सही येथे पूजा करताना दिसले. सीएम पुष्कर सिंह धामी यांनीही कामगारांच्या सुरक्षित बचावाचे श्रेय बाबा बोखनाग यांच्या आशीर्वादाला दिले होते.

baba baukhnag | Esakal

बाबा बोखनाग हे पर्वतांचे रक्षक

बाबा बौखनाग हे पर्वतांचे रक्षणकर्ते आहेत असे म्हणतात, उत्तरकाशीच्या राडी शीर्षस्थानी बोखनाग देवतेचे मंदिर देखील आहे, बाबा बौखनाग हे पर्वतांचे रक्षण करतात अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे.

baba baukhnag | Esakal

या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये एक आख्यायिका आहे. बाबा बोखनाग ज्या पर्वतांचे रक्षण करतात ते पर्वत या रूपात प्रकट झाले आहेत, येथे दरवर्षी जत्रा भरते, असे मानले जाते की बाबा बोखनाग पर्वतावर राहणाऱ्या लोकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

baba baukhnag | Esakal

आता उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्याच्या तोंडावर स्थापित बाबा बोखनागच्या मंदिरात दररोज पूजा केली जात आहे. असा दावाही केला जात आहे की, बोगदा बांधणाऱ्या टीमने इथली परंपरा पाळली नाही.

baba baukhnag | Esakal

खरे तर असे म्हटले जाते की, उत्तरकाशीमध्ये जेव्हा जेव्हा बोगदा बांधला जातो तेव्हा त्याच्या तोंडावर प्रथम बाबा बोखनागचे मंदिर बांधले जाते.

baba baukhnag | Esakal

स्थानिक लोकांच्या दाव्यावर विश्वास ठेवल्यानंतरच या टीमने येथे मंदिराची स्थापना केली.

baba baukhnag | Esakal

नवयुग कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेश्वर पवार यांनी स्वत: भाटिया गावात बाबा बौखनाग देवतांच्या दरबारात पोहोचून सर्व मजुरांना बाहेर काढण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

baba baukhnag | Esakal