Sandip Kapde
लक्ष्मण दास मित्तल, जे एकेकाळी LIC मध्ये विमा एजंट होते, त्यांचा फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादी 2024 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
यासह 93 वर्षांचे लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश बनले आहेत.
LIC एजंट ते अब्जाधीश होण्यापर्यंतच्या मित्तलच्या प्रवासाची कहाणी तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
एलआयसीमधून निवृत्त झाल्यानंतर व्यवसाय सुरू करणारे मित्तल आज 25 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कंपनीचे मालक आहेत.
लक्ष्मण दास मित्तल हे सोनालिका ग्रुपचे अध्यक्ष आहेत, जे देशातील तिसरे सर्वात मोठे ट्रॅक्टर उत्पादक आहे (सोनालिका ट्रॅक्टर).
पंजाबमधील होशियारपूर येथे 1931 मध्ये जन्मलेल्या लक्ष्मण दास मित्तल यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये विमा एजंट म्हणून करिअरची सुरुवात केली.
लक्ष्मण दास मित्तल यांनी पंजाब विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे, ज्यामध्ये ते संपूर्ण विद्यापीठात प्रथम आले.
त्यांनी प्रथम मारुती उद्योग (मारुती सुझुकी) ची डीलरशिप मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
1990 मध्ये ते वयाच्या 60 व्या वर्षी एलआयसी एजंट म्हणून निवृत्त झाले.
मित्तल यांनी आपल्या सर्व बचतीतून शेतीत वापरल्या जाणाऱ्या मशिन्सची निर्मिती करणारी कंपनी सुरू केली, पण 1996 मध्ये त्यांनी खरी झेप घेतली.
इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड (ITL) ची स्थापना केल्यानंतर, 1996 मध्ये, वयाच्या 66 व्या वर्षी, मित्तल यांनी सोनालिका ट्रॅक्टर्स सुरू केली, जी शेतकऱ्यांना खूप आवडली.
नालिका ग्रुप ही 25 हजार कोटींहून अधिक किमतीची कंपनी आहे, ज्याचे ट्रॅक्टर भारतातच नव्हे तर परदेशातही विकले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.