priyanka kulkarni
एका तरुणीच्या कान चित्रपट महोत्सवातील लूकची चर्चा होत आहे.
या तरुणीचं नाव नॅन्सी त्यागी असं आहे.
नॅन्सीनं स्वत: शिवलेला ड्रेस कान चित्रपट महोत्सवात परिधान केला होता.
जाणून घेऊयात नॅन्सीबद्दल आणि तिनं कान चित्रपट महोत्सवात परिधान केलेल्या ड्रेसबद्दल...
नॅन्सी त्यागीनं तिच्या कान चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या ड्रेसबद्दल सांगितलं आहे.
नॅन्सीनं कान चित्रपट महोत्सवातील फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "नवोदित कलाकार म्हणून 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पाऊल ठेवणं अवास्तव वाटतं."
"30 दिवस, 1000 मीटर फॅब्रिक आणि 20 किलोपेक्षा जास्त वजनाचा हा गुलाबी गाऊन मी मनापासून तयार केला आहे.", असंही नॅन्सीनं कॅप्शनमध्ये लिहिलं.
नॅन्सी त्यागी ही मूळची उत्तर प्रदेशची आहे.
नॅन्सीला इन्स्टाग्रामवर सुमारे 870,000 फॉलोवर्स आहेत. YouTube वर तिला एक मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. नॅन्सी ही तिच्या DIY ड्रेस डिझाइन आयडियामुळे प्रसिद्ध झाली.
अंजली अरोराचं सिनेसृष्टीत पदार्पण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.