विमानाचा रंग पांढराच का असतो? मजेशीर आहे कारण

Sudesh

विमान

तुम्ही पाहिलं असेल, की जवळपास सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांचा रंग हा पांढराच असतो.

Why Airplanes are White | eSakal

पांढरा रंग

कित्येक कंपन्या आपल्या ब्रँडनुसार विमानात काही भाग वेगळ्या रंगात रंगवतात. मात्र, विमानाचा मोठा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो.

Why Airplanes are White | eSakal

फायदा

याचा खरंतर विविध प्रकारे फायदा होतो. विमान गरम होऊ न देण्यापासून ते विमानाचं वजन कमी ठेवण्यापर्यंत पांढरा रंग उपयोगी पडतो.

Why Airplanes are White | eSakal

तापमान

पांढरा रंग हा सूर्याच्या अतिउष्ण किरणांना परावर्तित करतो. त्यामुळं, उंचीवरून उडणारं विमान कडक उन्हातही बऱ्याच प्रमाणात थंड राहतं.

Why Airplanes are White | eSakal

वजनाने हलका

हे तुम्हाला खरं वाटणार नाही, मात्र पांढरा रंग हा इतर रंगांपेक्षा हलका असतो. यामुळे देखील विमानाला रंगवताना याचा वापर होतो.

Why Airplanes are White | eSakal

इंधनाची बचत

पांढऱ्या रंगामुळे इतर रंगाच्या तुलनेत विमानाचं वजन कमी होतं. त्यामुळे कमी इंधनाची गरज भासते, आणि पैशांचीही बचत होते.

Why Airplanes are White | eSakal

रंग न देणे

विमान हलकं करण्यासाठी रंग न देणे या पर्यायाचाही विचार केला गेला. मात्र, त्यामुळे विमान लवकर गंजण्याची शक्यता होती.

Why Airplanes are White | eSakal

कमी खर्च

विमान गंजल्यावर होणाऱ्या तोट्यापेक्षा, पांढऱ्या रंगासाठी आणि पर्यायाने विमानाला वारंवार धुण्यासाठी लागणारा खर्च अधिक परवडणारा आहे.

Why Airplanes are White | eSakal

डेंट

पांढरा रंग देण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यामुळे विमानावर असणारे स्क्रॅच, क्रॅक किंवा डेंट स्पष्टपणे ओळखू येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Airplanes are White | eSakal