आहाराची वेळ पाळा रात्रीचे जेवण दहानंतर टाळा....पण का?

सकाळ डिजिटल टीम

फेब्रुवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला अन उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. मनाला त्रासदायक असलेला उन्हाळा अनारोग्यासही कारणीभूत ठरतो. आरोग्याच्या अनेक समस्या हातात हात घालून येतात.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

आहार आणि विहाराच्या बाबतीत ऋतू, वेळ व प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. अन्न पचवण्याची क्षमता केवळ आपल्या जैविक घड्याळावर अवलंबून असते. जसजसा दिवस पुढे जातो तसतसे आपले चयापचय मंदावते, यामुळे आहाराच्या वेळेचे बंधन पाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

सकाळपासून तर रात्रीपर्यंत खाल्लेल्या अन्नाचे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळे परिणाम होतात. रात्रीचे जेवण १० नंतर घेतल्यास शरीरातील साखर वाढीची शक्यता २० टक्क्याने वाढते. झोपण्याच्या तीन तास आधी जेवण करावे.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

सकाळी ९ वाजता खाल्लेल्या अन्नापेक्षा रात्री ८ वाजता खाल्लेल्या अन्नाचा पूर्णपणे वेगळा परिणाम होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात आपला आहार अतिशय संतुलित असणे आवश्यक आहे. किमान सकाळी तासभर चालण्याचा व्यायाम करावाच.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

या वेळा पाळाव्यात

सकाळी ८ ते ९ वाजता - न्याहारी

दुपारी १२ ते १ वेळेत - दुपारचे जेवण

रात्री ७.३० ते ८ वाजता - रात्रीचे जेवण

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

असा असावा आहार

न्याहारी : फळे, तृणधान्ये, प्रथिनेयुक्त अन्न, एक ग्लास दूध किंवा दही घेतल्यास दिवसभर शरीरासाठी आवश्यक खनिजे, ऊर्जेसाठी कर्बोदके आणि सूक्ष्म पोषक घटक मिळतात.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

दुपारचे जेवण: दुपारचे जेवण शरीराला हायड्रेट ठेवणारे असल्यास सुस्ती येत नाही. ब्रेड कमी किंवा नकोच. भात, भाजी, पोळीसह डाळ खिचडी, दही, ताक आदींचा समावेश करा.

रात्रीचे जेवण : सूप, मूग डाळ खिचडी, पनीर, टोफू,कोशिंबीर, आवश्यक असल्यास भाजीसह एक चपाती.

Why do not after 10 o'Clock in Night | Esakal

१९व्या वर्षी 'दंगल गर्ल'चा मृत्यू कशामुळे झाला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhani Bhatnagar