सकाळ डिजिटल टीम
जेव्हा कधी तुम्ही मॉल किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाता, तेव्हा तुम्ही तिथलं टॉयलेट नक्कीच वापरलं असेल.
पण तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का की या टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात?
टॉयलेट्सचे दरवाजे आणि फरशी यात एवढं जास्त अंतर असतं की ती जणू खिडकीच वाटेल.
हे अंतर ठेवण्यामागचं एक कारण म्हणजे हे टॉयलेट्स दिवसभर सातत्याने वापरात येत असतात. त्यामुळे फरशी सतत खराब होत असते.
फरशी आणि दरवाजात असलेल्या या अंतरामुळे टॉयलेटची फरशी स्वच्छ करणं सोयीचं जातं.
शिवाय, टॉयलेटमध्ये जर कोणाला काही त्रास झाला, समजा हार्ट अटॅक आला, किंवा कोणी बराच वेळ बाहेर आलं नाही. तर बंद दरवाज्यामुळे आत काय झालंय हे कळणार नाही. म्हणूनही हे दरवाजे खालून उघडे ठेवले जातात.
काही वेळा लहान मुलं टॉयलेट वापरतात. त्यांच्याकडून दरवाजा लॉक झाला तर तो कसा उघडायचा हे त्यांना समजत नाही.
अशा परिस्थितीत जर मुलाला मदतीला कोणी आलं नाही, तर ते मूल दरवाज्याच्या खालून बाहेर येऊ शकते.
आणखी एक उद्देश आहे. या खालून उघड्या दरवाजामुळे आपल्याला आतल्या व्यक्तीचे पाय तरी दिसतातच.
त्यामुळे चुकून कोणी आत जाण्याचा प्रश्नच येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.