सॅलड खाताना केलेली 'ही' चूक पडेल महागात! जाणून घ्या

Aishwarya Musale

सॅलड

सॅलड आरोग्यासाठी लाभदायक असते. सॅलडमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात. असं असलं तरी योग्य पद्धतीने खाणं गरजेचं आहे, नाहीतर शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

पचनसंस्थेवर वाईट परिणाम

सॅलड खाण्याचा शरीराला फायदा व्हावा यासाठी काही निय पाळणं गरजेचं आहे, ज्यामुळे सॅलडमधील पोषकतत्वांचा तुमच्या शरीराला फायदा होईल. संशोधनानुसार, जेवण आणि सॅलड एकत्र खाल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

पचनक्रिया बिघडू शकते

एका संशोधनाच्या अहवालानुसार, जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

यकृत

जेवण आणि सॅलड एकत्र खाल्ल्याने वेगवेगळ्या गोष्टी पचवण्यासाठी यकृताला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे सॅलड जेवणाच्या अर्धा तास आधी खावं. दिवसभरात मधल्या वेळेत थोडी भूक लागल्यावर सॅलड खाणंही उत्तम आहे.

भरपूर ऊर्जा मिळेल

थंडीमद्ये गाजर, मुळा, कोबी, यांचा वापर करुन तयार केलेलं सॅलड आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि पचनक्रिया सुरळीत राहील.

आरोग्यासाठी फायदेशीर

यासोबतच फ्रूट सॅलडही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही मौसमी फळांचा समावेश आहारात करु शकता

सॅलड खाण्याची वेळ

बहुतेकांना हा प्रश्न सतावतो की, सॅलड खाण्याची योग्य वेळ कोणती, याचं उत्तर इथे जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे जेवताना सॅलड खाण्याची सवय पूर्णपणे चुकीची आहे.

सॅलड

जेवणाच्या अर्धा तास आधी खाणे योग्य ठरेल. सॅलड पचनाला थंड असतं आणि जेवण गरम अशा वेळी थंड आणि गरम दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दातांचे नुकसान होतं आणि आपली पचनक्रियाही मंदावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.