विनयन वाघमारे
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध दुर्गापूजेच्या मूर्ती घडवताना एका अत्यंत अनोख्या परंपरेचे पालन केले जाते ती म्हणजे वेश्यालयाच्या दारातील माती आणण्याची
कोलकात्याच्या ‘कुमारटुली’ परिसरातील मूर्तिकार गंगेची माती, शेण, गोमूत्र आणि वेश्यालयाच्या उंबरठ्यावरील माती एकत्र करून आई दुर्गेची मूर्ती साकारतात.
या परंपरेनुसार वेश्यालयाच्या उंबरठ्यावरील मातीला अत्यंत पवित्र मानले जाते. या मातीचा समावेश केल्याशिवाय दुर्गेची मूर्ती पूर्ण मानली जात नाही.
अशी समजूत आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वेश्यालयात प्रवेश करते, तेव्हा ती तिचे सर्व पुण्य, सदाचार आणि पावित्र्य दाराबाहेरच सोडून जाते. त्यामुळे उंबरठ्यावरील माती सर्व गुणांनी युक्त मानली जाते.
दुर्गा ही आदिशक्तीचे रूप आहे. समाजाच्या दृष्टीने उपेक्षित किंवा दुर्लक्षित मानल्या गेलेल्या घटकांनाही देवीच्या कार्यात सन्मानाचे स्थान देणे, हा या परंपरेचा मुख्य उद्देश आहे.
ही प्रथा समाजाला आठवण करून देते की उत्सव आणि भक्तीमध्ये कोणताही वर्ग किंवा व्यवसाय अस्पृश्य नाही. सर्वांना एकत्र सामावून घेणे हीच खरी संस्कृती आहे.
मूर्तिकार किंवा पुजारी स्वतः वेश्यालयात जाऊन संबंधित महिलांकडे आदराने ही माती मागतात. ही माती स्वखुशीने दिली तरच ती पूजेत स्वीकारली जाते.
सोनागाचीची माती ही केवळ एक प्रथा नसून, समाजमन बदलण्याचा आणि स्त्रीच्या अस्तित्वाला आदर देण्याचा एक विचार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.