Winter Breakfast : थंडीत चहासोबत 'हे' स्नॅक्स खा अन् हेल्दी रहा

सकाळ डिजिटल टीम

ऊन, पाऊस अन् थंडी असा तिन्हीचा मेळ सध्या अनुभवायला येत असला तरी थंडीची चाहुल मात्र लागली आहे. याकाळासाठी टेस्टी आणि हेल्दी पदार्थ.

tea | esakal

शेंगदाणा चिक्की हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. हिवाळ्यात शेंगदाणा चिक्की शरीराला उर्जा देणारी असते. गुळातून लोह, शेंगदाण्यातून प्रथिनं मिळतात.

Peanut Chikki | esakal

मूग डाळीचे समोसे चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम असतात. मूगाची डाळ पचायला हलकी आणि भरपूर प्रथिनं देणारी आहे.

Mung Samosa | esakal

जवसाच्या बिया वाळवून भाजून त्याची पावडर करा. त्यात थोडा गुळ, अक्रोड पूड, मगज, भोपळ्याच्या बिया एकत्र बारीक करून त्याची स्वादिष्ट पंजिरी बनवा.

Flex Seeds | esakal

पालक भजी हा बहुतेकांचा आवडता नाश्ता असतो. ताज्या पालकाच्या पानांनी बनवलेली ही भजी आणि चहा हे थंडीतलं एकदम फक्कड काँबिनेशन ठरतं.

Palak Pakoda | esakal

फिश मीट बॉल्स - ट्यूना, ओट्स, लीक आणि अंड्यातील पांढऱ्या बलकाचा वापर करून बनवलेला हा नाश्ता टेस्टी आणि हेल्दी आहे. मिंट मेयोसोबत खावे.

Fish Meat Ball | esakal

गाजर फ्राय संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत गप्पा मारत आनंद घेत खा. ऑलिव्ह ऑईल, करी पावडर आणि चाट मसाला यापासून बनवलेल्या गाजर फ्राय टेस्टी नाश्ता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Carrot fry | esakal