थंडीमध्ये या लोकांनी चुकूनही खाऊ नये फ्लॉवरची भाजी, अन्यथा..

Aishwarya Musale

हिवाळ्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे बाजारात सहज मिळतात. या भाज्यांमध्ये फ्लॉवर ही सर्वाधिक  विकली जाणारी भाजी आहे. हिवाळ्यात, बरेच लोक त्यांच्या घरी फ्लॉवरचे विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात आणि खातात.

काहींना फ्लॉवरचा पराठा आवडतो, तर काहींना भाजी खायला आवडते. कोबीची चव जबरदस्त असते. तसेच, ते पचायला खूप सोपे आहे. काही लोकांनी फुलकोबी टाळावी. कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते.

​युरिक ऍसिड

फॉल्मवरध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयोडीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी इत्यादी अनेक पोषक घटक असतात. अशा स्थितीत याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

पण जर तुमचे युरिक ऍसिड जास्त असेल तर चुकूनही फ्लॉवर खाऊ नका. जर तुम्ही हिवाळ्यात फ्लॉवर खात असाल तर ते तुमच्या गॅस्ट्रिक आणि किडनीमध्ये स्टोनची समस्या वाढवू शकते.

थायरॉइडची समस्या

जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर चुकूनही फ्लॉवरचे सेवन करू नका. थायरॉईडमध्ये फ्लॉवरचे सेवन केल्याने टीएसएचची पातळी वाढते, ज्यामुळे थायरॉइडशी संबंधित समस्या वाढतात.

​फ्लॉवर कोणी खावा

लठ्ठपणा - जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होत असेल तर फ्लॉवरचे भरपूर सेवन करा. याच्या वापराने तुम्ही वजन वेगाने नियंत्रित करू शकता. फ्लॉवर तुमच्या डाएटसाठी अतिशय चांगला आहे.

हृदयाशी संबंधीत आजार

हृदयाशी संबंधीत आजार असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात फ्लॉवरचा समावेश करावा. यामुळे एंटीऑक्सिडेंट्स हार्ट फंक्शनला उत्तम करतात. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

फ्लॉवर खाल्यामुळे अनेक फायदे होतात. पोषकतत्वांनी भरपूर असा हा फ्लॉवर आहे. मात्र काही लोकांना याचे सेवन करून त्रास होतो. त्यामुळे तुम्ही खाताना विचार करायला हवा.

त्वचा आणि केसांसाठी ॲव्होकॅडो अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.