वर्क फ्रॉम होम केल्याने तुमच्या आरोग्यावर होतोय परिणाम? या टिप्स करा फॉलो

Aishwarya Musale

ऑफिस

जे घरून काम करतात त्यांच्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आव्हानात्मक होते. कारण तुम्ही ऑफिसचे काम करता आणि तुम्हाला घरची कामेही करावी लागतात.

Work From Home | sakal

आरोग्य

अशा स्थितीत तुमचे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टीचा कामावर परिणाम होऊ लागतो. काही लोक असे असतात जे डोळे उघडताच लॅपटॉप उघडतात आणि दिवसभर काम करत राहतात.

Work From Home | sakal

निरोगी

तुमच्यासाठी असे करणे योग्य नाही. यासाठी काही टिप्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता.

Work From Home | sakal

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम करताना जास्तीत जास्त पाण्यावर भर द्या. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

Work From Home | sakal

साखर

जास्त साखर, कार्ब आणि फॅट तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. यामुळे मुरुमांबरोबर पुरळ येण्याचा धोका असतो. हे सर्व पदार्थ तुमच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. तुमचे वजन वाढू शकते.

Work From Home | sakal

व्यायाम

जर तुम्ही घरून काम करत असाल तर नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि तुम्ही हेल्दी आणि फिट राहता. यामुळे तुम्हाला निरोगी आणि तजेलदार त्वचा देखील मिळते.

Work From Home | sakal

विश्रांती घ्या

जर तुम्ही जास्त वेळ स्क्रीनवर काम करत असाल तर त्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही नुकसान पोहोचू शकते. अशा परिस्थितीत वेळोवेळी विश्रांती घ्या, डोळ्यांना विश्रांती द्या आणि डोळ्यांवर पाणी शिंपडा.

Work From Home | sakal

सनस्क्रीन

तुम्ही घरी असलात तरीही तुम्ही तुमचे CTM म्हणजेच क्लिंझर, टोनर आणि मॉइश्चरायझरचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खात्री करा. तसेच सनस्क्रीन लावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work From Home | sakal