रक्तदानाविषयी या 13 महत्वाच्या गोष्टी माहितीयेत? जाणून घ्या

धनश्री भावसार-बगाडे

10 युनिट्स

एका व्यक्तीच्या शरीरात सरासरी 10 युनिट्स (5-6 लीटर) रक्त असते.

World Blood Donor Day | esakal

१ युनिट रक्त

रक्तदान करताना रक्तदात्याच्या शरीरातून फक्त १ युनिट रक्त घेतले जाते.

World Blood Donor Day | esakal

कार अपघात

कधीकधी फक्त एका कार अपघातात जखमी व्यक्तीला 100 युनिट रक्ताची आवश्यकता असते.

World Blood Donor Day | esakal

3 लोकांचे प्राण

एकदा रक्तदान केल्याने तुम्ही 3 लोकांचे प्राण वाचवू शकता.

World Blood Donor Day | esakal

'ओ निगेटिव्ह'

भारतातील फक्त 7 टक्के लोकांचा रक्तगट 'ओ निगेटिव्ह' आहे.

World Blood Donor Day | esakal

युनिव्हर्सल डोनर

'ओ निगेटिव्ह' रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात, ते कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते.

World Blood Donor Day | esakal

आणीबाणीच्या वेळी

आणीबाणीच्या वेळी जसे की एखाद्या नवजात बालकाला किंवा इतरांना रक्ताची गरज असते आणि त्याचा रक्तगट माहीत नसतो, तेव्हा त्याला 'ओ निगेटिव्ह' रक्त दिले जाऊ शकते.

World Blood Donor Day | esakal

रक्तदानाची प्रक्रिया

रक्तदानाची प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि रक्तदात्याला यात कोणतीही अडचण येत नाही.

World Blood Donor Day | esakal

रक्तदानाचं वय

एखादी व्यक्ती 18 ते 60 वर्षे वयापर्यंत रक्तदान करू शकते.

World Blood Donor Day | esakal

कोण असतं पात्र?

जेव्हा रक्तदात्याचे वजन, नाडीचा दर, रक्तदाब, शरीराचे तापमान इत्यादी सामान्य असल्याचे आढळून येते तेव्हाच डॉक्टर किंवा रक्तदान पथकातील सदस्य तुमचे रक्त घेतात.

World Blood Donor Day | esakal

रक्तदान कालावधी

पुरुष नियमितपणे 3 महिन्यांच्या अंतराने आणि महिला 4 महिन्यांच्या अंतराने रक्तदान करू शकतात.

World Blood Donor Day | esakal

कोणी करू नये?

प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. तुम्ही निरोगी असाल, ताप किंवा आजार नसेल तरच तुम्ही रक्तदान करू शकता.

World Blood Donor Day | esakal

यांनी रक्तदान करणे टाळावे

रक्तदानानंतर तुम्हाला चक्कर येणे, घाम येणे, वजन कमी होणे किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या दीर्घकाळ राहिल्यास रक्तदान करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Blood Donor Day | esakal