World Elephant Day 2023 : हत्तीची त्वचा असते इतकी जाड, या प्राण्याच्या खास गोष्टी नक्कीच जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

जागतिक हत्ती दिन

जागतिक हत्ती दिन (World Elephant Day) दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हत्तीच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश्य आहे.

World Elephant Day 2023 | sakal

त्वचा असते जाड

हत्तीच्या शरीरावरील त्वचा  2.5 सेंटीमीटर इतकी जाड असते. हत्ती आपली त्वचा नियमित स्वरुपात स्वच्छ करतात.  

World Elephant Day 2023 | sakal

सर्वात मोठा प्राणी

आफ्रिकन हत्ती हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. यामध्ये नर सरासरी 3 मीटर इतका उंच आणि 6 टन इतके त्याचे वजन असते. 

World Elephant Day 2023 | sakal

हत्तीच्या सोंडेचे वैशिष्ट्य

हत्तीच्या सोंडेमध्ये सुमारे एक लाख 50 हजार मसल्स युनिट्स असतात. हत्ती आपल्या सोंडेमध्ये एकाच वेळेस जवळपास 8 लिटर पाणी भरून घेऊ शकतात. 

World Elephant Day 2023 | sakal

हत्तींचे खाद्य

हत्तींसाठी नियमित 150 किलोग्रॅमपर्यंत खाद्यपदार्थांचे सेवन करणं आवश्यक असते. म्हणून हा प्राणी आपल्या दिवसातील बहुतांश वेळ खाण्यापिण्यातच घालवतो.

World Elephant Day 2023 | sakal

हत्तीची तल्लख स्मरणशक्ती

हत्तीचा टेम्पोरल लोब (स्मृतीशी संबंधित मेंदूचा भाग) हा माणसांच्या तुलनेत मोठा असतो, म्हणूनच हत्ती कधीच काही विसरत नाहीत.

World Elephant Day 2023 | sakal

जन्मानंतर लगेचच चालू शकतात 

हत्तीचे पिल्लू जन्मानंतर 20 मिनिटांच्या आतच आपल्या पायांवर उभे राहू शकते आणि एक तासातच ते चालूही लागते.  

World Elephant Day 2023 | sakal

असा करतात संवाद 

तसं पाहायला गेले तर हत्ती वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधतात. हा प्राणी जमिनीवर कंपन निर्माण करून एकमेकांना संकेतही देतात.

World Elephant Day 2023 | sakal

हत्ती उभे राहूनच झोपतात 

अभ्यासातील माहितीनुसार हत्ती झोपून तसंच उभे राहूनही झोपू शकतात. पण तज्ज्ञांच्या माहितीनुसार जंगलातील बहुतेक हत्ती उभे राहून झोपतात कारण त्यांना हालचाल करणे सोपे जाते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Elephant Day 2023 | sakal