हे आहेत भारतातील रॉयल वाघ जे पाहायला परदेशातून यायचे पर्यटक

Aishwarya Musale

वाघ

वाघ हा निसर्गातील की-स्टोन प्रजातींपैकी एक मानला जातो. वाघांमुळे निसर्गाची विविधता आणि संपन्नता कायम राहते. आज आम्ही तुम्हाला भारतातील रॉयल वाघांची माहिती सांगणार आहोत.

tiger | sakal

वाघडोह

ताडोबा अभयारण्यातील वाघडोहला बिग डॅडी किंवा स्कारफेस नावाने देखील ओळखले जात होते. ३०० किलो वजनाच्या या वाघाला ताडोबाचा राजा असं म्हटलं जायचं.

tiger | sakal

उस्ताद

उस्ताद हा रणथंबोर नॅशनल पार्क मधील वाघ होता, त्याला T-24 या नावानेही ओळखलं जात होतं. वन्यजीव फोटोग्राफर्सची तो पहिली पसंती होता.

tiger | sakal

चार्जर

चार्जर हा बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील नर वाघ होता. सिता आणि चार्जर यांनी 'बारा बच्चा' आणि 'लंगरु' या बछड्यांना जन्म दिला.

tiger | sakal

मुन्ना

कान्हा राष्ट्रीय उद्यानात सर्वात जास्त फोटो काढण्यात आलेला रॉयल बंगाल टायगर म्हणजे मुन्ना. त्याने १० वर्ष या उद्यानात वर्चस्व गाजवलं. तो दिसायला सुंदर आणि राजबिंडा होता.

tiger | sakal

जालीम

रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील टी-२५ला डॉलर किंवा जालीम नावाने ओळखलं जात होतं. जालीम त्याच्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध होता.

tiger | sakal

सोनम-

सोनम ही माधुरी या वाघीणीची मुलगी होती. तिला मोना, लारा आणि सिता या बहीणी देखील होत्या. टायगर सिस्टर्स ऑफ तेलिया ही डिस्कवरीने बनवलेली डॉक्युमेंटरी या चार वाघींणींवर चित्रीत करण्यात आली आहे.

tiger | sakal

येडा आण्णा

येडा आण्णा हा रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील वाघ होता, ज्याला ब्रोकन टेल नावाने देखील ओळखला जायचा. ब्रोकन टेल नावाची डॉक्युमेंटरी देखील त्याच्यावर चित्रीत करण्यात आली होती. त्याचा मृत्यू रेल्वे ट्रॅक ओलांडताना झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tiger | sakal