न्युमोनियापासून वाचण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश

Aishwarya Musale

जगभरात 12 नोव्हेंबर म्हणजेच आजचा दिवस हा जागतिक न्युमोनिया दिन म्हणून साजरा केला जातोय. लोकांना न्युमोनिया आजाराचे गांभीर्य कळावे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

न्युमोनिया आजारात फुफ्फुसांना संसर्ग होतो. न्युमोनिया झाल्यास, श्वसनमार्गामध्ये द्रव किंवा पू भरला जातो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याव्यतिरिक्त, इतर अनेक समस्या दिसतात.

आहारात अशा काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे, की ज्यामुळे न्युमोनियाचा धोका कमी होण्यास मदत होईल.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याच्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, फायबर, पोटॅशियम तसेच इतर अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. यामुळे न्यूमोनियापासून आपले संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.

फळांचे ज्यूस

न्यूमोनिया झाल्यास लहान मुले आणि मोठ्यांनी जास्तीत जास्त ताज्या फळांचा ज्यूस पिणे चांगले आहे. अशा ताज्या फळांचा ज्यूस प्यायल्यास न्युमोनिया टाळता येतो.

अंडी

न्युमोनियाचा धोका हिवाळ्यात जास्त असतो. त्यामुळे तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करा. अंडी गरम असतात. शिवाय त्यात पोषक तत्वे असतात. त्यामुळे अंडी खाल्ल्याने न्युमोनियावर नियंत्रण ठेवता येईल.

लसूण

लसूण न्युमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर हे गुणधर्म लसणात आढळतात. यामुळे फंगल इंफेक्शनपासून संरक्षण होते.

हळद

हळद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच हळदीचे दूध प्यायल्याने श्वासोच्छवासाचा त्रासही टाळता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.