World Saree Day : 'या' साड्या नसतील तर तुमचं 'वॉर्डरोब' रिकामंच समजा

सकाळ डिजिटल टीम

कांजीवरम साड्यांमध्ये व्हरायटी खूप असते. अरूंद काठाची , टेंपल बॉर्डर किंवा रेखा नेसते तशी मोठ्ठ्या काठाची टेंपल बॉर्डर, एक ना दोन. 

World Saree Day | esakal

पोचमपल्ली म्हणजेच पोचमपल्ली इकत या साड्या सध्याच्या तेलंगणा राज्यातल्या भूदान पोचमपल्ली या गावात बनवल्या जातात.

World Saree Day | esakal

पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. पदराच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते. तसंच पारंपारिक पैठण्या या नवीन पानाफुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात. 

World Saree Day | esakal

इल्कल/इरकल साडी पूर्वी घराघरांतल्या आज्यांकडे अशा साड्या पुष्कळ असत. इल्कल सहावारी आणि नऊवारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. 

World Saree Day | esakal

बनारसी साडीला महाराष्ट्रात वेगळंच महत्व आहे.  आपल्याकडे लग्नामध्ये वापरला जाणारा शालू म्हणजे बनारसी सिल्कचा एक प्रकार. त्यात इतरही बरेच प्रकार येतात.

World Saree Day | esakal

फक्त हीच साडी म्हणजे टसर सिल्क असं म्हणता येणं अवघड आहे. प्रिंटेड टसर, कांथा वर्क केलेली टसर, नुसतीच पानाफुलांच्या वेलबुट्टीची टसर असे खूपच प्रकार सांगता येतील. 

World Saree Day | esakal

मुग्गा नावाच्या रेशमी किड्याच्या कोशापासून बनवलेल्या या मुग्गा सिल्क साड्या आसामची खासियत आहे. नेहमीच्या पाचवारी गोल साडीसोबतच मुग्गा सिल्कमधले मेखेला चादोर फार प्रसिद्ध आहेत.

World Saree Day | esakal

माहेश्वरी साडी हा कॉटन आणि रेशमी धागे एकत्र विणलेला तलम प्रकार आहे. मध्यप्रदेशातल्या माहेश्वर गावच्या या साड्या वजनाला हलक्या आणि वापरायला सुटसुटीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Saree Day | esakal