तुमच्या मुलांनाही आहे का माती खाण्याची सवय? मग हे उपाय येतील तुमच्या कामी...

Aishwarya Musale

जागतिक मृदा दिन

दरवर्षी 5 डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिन' साजरा केला जातो. पहिला जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर 2014 रोजी साजरा करण्यात आला.

कॅल्शियमची कमतरता

जसं की तुम्हाला माहित आहे बऱ्याच लोकांना माती खाण्याची सवय असते. माती तोच व्यक्ती जास्त खातो ज्याच्या शिरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे अनेक लहान मुलेही माती खातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

मातीमध्ये खेळणे

मुले मातीमध्ये खेळत असताना माती अतिशय चवीने खात असलेलं आपण अनेकदा पाहिले असेल. त्यांच्या या सवयीने त्यांचे आईवडीलही बहुतेकवेळी हैराण झालेले दिसतात.

आरोग्यासाठी घातक

माती खाण्याची सवय लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या सवयीमुळे मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. ही सवय सुटावी याकरिता मुलांचे आई वडील अनेक उपाय अवलंबताना दिसतात.

घरगुती उपाय

माती खाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजार होऊ शकतात. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता.

माती खाण्याची सवय

दररोज मुलांना केळी आणि मध एकत्र करुन द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.

आहार

रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना पाण्यासोबत ओव्याचे चुर्ण द्या. यामुळेही मुलांची माती खाण्याची सवय दूर होईल. मुलांच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.

लवंग

मुलांची माती खाण्याची सवय सोडवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंग बारीक करून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा लवंग पावडर पाण्यासोबत मुलांना खायला द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.