ब्रॅडमननंतर यशस्वी दुसरा... विराट कोहलीलाही टाकणार मागं

अनिरुद्ध संकपाळ

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात 37 धावा करत रोहित शर्मासोबत 84 धावांची खणखणीत सलामी दिली.

या भागीदारीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचला होता. विशेष म्हणजे यशस्वीने दुसऱ्या डावातील 37 धावांच्या खेळीद्वारे अनेक माईल स्टोन पार केले.

यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 971 धावा केल्या आहेत. कारकिर्दीच्या आठ सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो डॉन ब्रॅडमन (1210) यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

यशस्वीने 37 धावा केल्यानंतर त्याने भारत-इंग्लंड एका मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटशी बरोबरी केली.

विराट कोहलीने 2016 च्या मालिकेत 665 धावा केल्या होत्या. यशस्वीच्या देखील यंदाच्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 665 धावा केल्या आहेत.

यशस्वी जैस्वाल विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे. कारण मालिकेतील अजून पाचवा कसोटी सामना शिल्लक आहे. त्यामुळे त्याच्याकडे अजून दोन डाव आहेत.

कमी लेखायंच नव्हतं ... जुरेल संदर्भातील 'त्या' पोस्टवर सेहवागनं दिलं स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.