ग्रीन टीचे फायदे अनेक, पण या चुका पडतील महागात... जाणून घ्या

Aishwarya Musale

दुधाचा चहा

दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो.

green tea | sakal

आरोग्य

आरोग्यासाठी ग्रीन टी अतिशय फायदेशीर असून यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते. 

green tea | sakal

ग्रीन टी

ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत, पण याचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.

green tea | sakal

ग्रीन टी पिताना या चुका करु नका

जर तुम्ही सकाळी अनोशेपोटी ग्रीन टीचं सेवन करत असाल, तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. पचनाशी संबंधित कोणतीही समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खा.

green tea | sakal

जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे

ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

green tea | sakal

 रात्री झोपताना ग्रीन टी पिणे

ग्रीन टीमध्ये कॅफिन असल्याने रात्रीच्या वेळी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होतो. झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नये.

green tea | sakal

जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पिणे

जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिण्याची चूक चुकूनही करू नये. कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. ग्रीन टी जर तुम्हाला प्यायची असेल तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.

green tea | sakal

औषधांसह ग्रीन टी पिणे

ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यामध्ये प्रक्रिया होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

green tea | sakal