तुमच्या लघवीचा रंग देतो या ५ गंभीर आजारांचे संकेत, वेळीच व्हा सावध

साक्षी राऊत

लघवीचा रंग

निरोगी माणसाच्या लघवीचा रंग हा पाण्यासारखा पांढरा शुभ्र किंवा हलका पिवळा दिसतो. मात्र तुमच्या युरिनचा रंग अगदी वेगळा दिसत असेल तुमच्या एखादा आजार नक्कीच जन्म घेतोय. रंगानुसार समजून घेऊया आजारांचे संकेत

Urine Color

हलका पिवळा रंग

हलका पिवळा रंग शरीरात पाण्याची कमतरता आणि किडनीसंबंधित काही आजारांचे संकेत देते. मधु्मेहामुळेही युरिनचा रंग हलका पिवळा दिसू शकतो.

Urine Color

गडद पिवळा

लघवीचा गडद पिवळा रंग डिहायड्रेशनचं लक्षण दर्शवतं. याचा अर्थ असा होतो की शरीरात पाण्याची कमतरता वाढत आहे. तेव्हा तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

Urine Color

ढगाळ रंग

लघवीचा ढगाळ रंग दिसल्यास शरीरात एखाद्या गंभीर इन्फेक्शनची सुरुवात होत असल्याचे दर्शवते. ही समस्या ब्लॅडर इन्फेक्शनमुळेही उद्भवू शकते.

Urine Color

लाल रंग

लघवीचा लाल रंग हा अनेक कारणांनी असू शकतो. जसे की तुम्ही बीट खाल्ले असल्यास किंवा बीटचा ज्यूस प्यायलास लाल रंगाची लघवी होऊ शकते.

Urine Color

तपकिरी रंग

लघवी तपकिरी रंगाची होत असल्यास यकृत किंवा गॉलब्लॅडरमध्ये इन्फेक्शन असू शकते.

Urine Color

हिरवट रंग

हाय डोज औषधी खाल्ल्याने किंवा कलर्ड फूड खाल्ल्याने तुमच्या लघवीचा रंग हिरवट दिसू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urine Color