यूट्यूबवर किती सबस्क्राईबर असल्यास मिळतात पैसे? जाणून घ्या

Sudesh

यूट्यूब

यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करुन कित्येक जण लाखो रुपये कमावतात हे आपल्याला माहिती आहे. अनेक यूट्यूबर्स तर या माध्यमातून कोट्यधीश झाले आहेत.

YouTube Monetization Rules | eSakal

जाहिराती

यूट्यूबवरुन पैसे कमावण्यासाठी तुमच्या व्हिडिओंवर जाहिराती येणं गरजेचं आहे. यासाठी तुमचे व्हिडिओ मॉनिटाईज असणं आवश्यक आहे.

YouTube Monetization Rules | eSakal

नियम व अटी

यूट्यूबवरुन पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कमीत कमी किती सबस्क्राईबर हवेत, आणि कोणत्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

YouTube Monetization Rules | eSakal

सबस्क्राईबर

यूट्यूब अकाउंट मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या चॅनलला कमीत कमी ५०० सबस्क्राईबर असणं गरजेचं आहे. तसंच तुमचे व्हिडिओ मॉनिटाईज होण्यासाठी कमीत कमी १००० सबस्क्राईबर्स आवश्यक आहेत.

YouTube Monetization Rules | eSakal

वॉच टाईम

केवळ सबस्क्राईबर असून फायदा नाही, तर तुमच्या व्हिडिओंना किती पाहिलं जातं हेदेखील तपासणं गरजेचं आहे.

YouTube Monetization Rules | eSakal

४००० तास

तुमच्या चॅनलवरील व्हिडिओंचा वॉच टाईम एका वर्षाच्या आत ४००० तास असायला हवा. म्हणजेच, १२ महिन्याच्या काळात तुमचे व्हिडिओ एकूण चार हजार तास पाहिले गेले पाहिजेत.

YouTube Monetization Rules | eSakal

यूट्यूब शॉर्ट्स

जर तुम्ही यूट्यूबवर शॉर्ट्स व्हिडिओ शेअर करता, तर त्यांना 90 दिवसांच्या आत 10 मिलियन पब्लिक व्ह्यूज मिळायला हवेत.

YouTube Monetization Rules | eSakal

किती कमाई?

या माध्यमातून काही यूट्यूबर्स एका आठवड्याला सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत कमावतात. अर्थात, तुमचं चॅनल किती मोठं आहे आणि तुम्हाला कोणत्या जाहिराती मिळतात यावर तुमची कमाई ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Monetization Rules | eSakal