चहलने इतिहास रचला! शेन वॉर्नचा मोडला 13 वर्ष जुना विक्रम

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे.

yuzvendra chahal

त्याने 5 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

yuzvendra chahal

गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने 4 षटकात 43 धावा दिल्या पण 2 विकेट्सही आपल्या नावावर केल्या.

yuzvendra chahal

यासह चहलने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्नचा 13 वर्षे जुना विक्रमही मोडला.

युझवेंद्र चहल आता आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

yuzvendra chahal

चहल 2022 च्या आयपीएल हंगामात राजस्थान संघाचा भाग बनला, तेव्हापासून त्याने 36 सामने खेळताना राजस्थानसाठी 58 बळी घेतले आहेत.

yuzvendra chahal

तर 2008 ते 2011 या काळात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून खेळलेल्या शेन वॉर्नने 55 सामन्यात 57 विकेट घेतल्या.

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या सिद्धार्थ त्रिवेदीच्या नावावर आहे, ज्याने 76 सामन्यांमध्ये 65 बळी घेतले आहेत.

दुसऱ्या स्थानावर शेन वॉटसनचे नाव आहे ज्याने 78 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.