

आपल्या देशात लग्न कोणत्याही परंपरेनुसार झाले तरी काही गोष्टी सर्वांच्याच लग्नात पहायला मिळतात. लग्न कुठेही झाले, कमी बजेटमध्ये झालेले असो वा अधिक पैसे खर्च करून लग्नात नवरीला चुनरी देण्याची पद्धत आहे. नवरीमुलीला वराकडून शगुन दिला जातो. तेव्हा हमखास लाल रंगाची चुनरी असते.
लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने केले तरी वरमाला घालताना नवरीला चुनरी घ्यावी लागते. नवरीच्या श्रृंगार रसातील ही एक महत्त्वाची वस्तू आहे. तर तुम्हीही नवरीसाठी स्पेशल चुनरी शोधत असाल तर तुम्हाला बजेटमधील चुनरी खरेदी करता येईल.
सध्या बाजारात लाल रंगातील, लेस वर्कच्या आणि सौभाग्यवती भव: असे लिहिलेल्या अनेक चुनरी आहेत. तुम्हाला हा चुनरी स्वस्तात खरेदी करता येतील.
सध्या लग्नात साधे सोबर रंग वापरले जातात. मात्र आजही लग्नात लाल रंगाचाच लेहंगा घेतला जातो. लाल रंग हा शक्तीचे प्रतिक आहे, त्यामुळे घरातून पाठवणी करताना मुलींना या रंगाचीच साडी, लेहंगा परिधान करण्याची परंपरा आहे. या लेहंग्यावर लाल रंगाचीच चुनरी घेता येईल. ही चुनरी सौभाग्यवती भव: असं लिहीलेल्या काठाची आहे. त्यामुळे ती एक वेगळी छाप तुमच्या ड्रेसिंग स्टाईलवर सोडेल. याची किंमत ९९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गोल्डन काठ असलेली ही चुनरी आहे जी स्पेशली नव्या वधुसाठी बनवलेली आहे. या चुनरीवर सौभाग्यवती भव: असे लिहीलेले आहे. ज्यामुळे नव्या नवरीला आशिर्वादही दिल्यासारखे होते. या चुनरीला सोनेरी लेस आहे त्यामुळे ती शोभून दिसते. ही चुनरी अडीच मिटरची आहे. लाल रंगाच्या या चुनरीवर बारीक स्टोनही जोडलेले आहेत. याची किंमत १,५४६ इतकी आहे.
ही चुनरी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
राजस्थानी प्रकारातील ही ओढणीसारखीच चुनरी आहे. राजस्थानी बांधणी प्रकारातील यावर वर्क केलेले आहे. ही चुनरी नवरीमुलीच्या डोक्यावर अन् खांद्यावर घेतली जाते. जर तुम्हीही लग्नात मारवाडी लुक करणार असाल तर ही चुनरी नक्कीच तुमच्या सौंदर्यात भर घालेल. या चुनरीला विशेष असा ब्रोच असतो. त्यामुळे याचा लुक अधिक खुलून येतो. या चुनरीची किंमत ४९९ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुठल्याही साडीवर किंवा साऊथ इंडियन लुकवर शोभेल अशी ही चुनरी आहे. ही चुनरी लाल रंगाची आहे त्यावर वर्क केलेले आहे. काठही ब्रॉड आहेत. त्यामुळे कोणत्याही साडीला अधिक सुंदर बनवण्याचे कौशल्य या चुनरीमध्ये आहे. या चुनरीची साईज २.२५ सेमी आहे. याची किंमत ८९९ रूपये आहे.
ही चुनरी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या नवरीसोबत करवली,वराच्या बहिणी, वहिणीही लग्नात लेहंगा घालतात. लग्नात होणाऱ्या वेगवेगळ्या विधींना वेगळा लुक केला जातो. त्यामुळे लग्नकार्यात वेगळे ट्रेंड फॉलो केले जातात. तेव्हा लग्नाच्या एका सोहळ्याला लेहंग्यावर परिधान करण्यासाठी ही चुनरी खरेदी करू शकता. सर्वांचाच लुक या ओढणीमुळे खुलेल याची किंमत ८९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोणत्याही ऑफव्हाईट रंगाच्या ड्रेसवर, लेहंग्यावर शोभेल अशी ही सुंदर चुनरी आहे. ही चुनरी नेटची असून ती लाल रंगाची आहे. लाल रंगाच्या या चुनरीवर ब्रॉड लेस आहे. या लेसमुळे चुनरीला खरी शोभा येते. या चुनरीची किंमत ९९९ इतकी आहे.
ही चुनरी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
राजस्थानी, गुजराती साडीचा पल्लू उलट खांद्यावर असतो. त्या पल्लूला शोभेल अशी ही चुनरी आहे. ही पद्धत राजस्थान, मारवाडी लग्नात तुम्ही पाहिली असेल. तुम्ही नेसलेल्या साडीवरच हा पल्लू घेता येतो. याला सुंदर वर्क केलेले आहे. तसेच यावर ब्रोच देखील आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या लग्नाच कस्टमाईज गोष्टींचा अधिक ट्रेंड आहे. हा ट्रेंड वर-वधुच्या कपड्यांमध्येही दिसून येतो. तुम्हाला चुनरीचा ट्रेंड फॉलो करण्यासाठी केवळ तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव इथे द्यावे लागेल. त्यानुसार तुम्हाला ही चुनरी बनवून मिळेल. Krishna ki dulhan असे ट्रेंड इथे मिळेल. तुम्हाला ही चुनरी ९९९ मध्ये मिळेल.
ही चुनरी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.