

बाहेरील कठोर हवामानाचा आपल्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या अवयवांपैकी एक आहे. चेहऱ्याची काळजी घेणे जितके महत्त्वाचे आहे. कारण चेहरा आपल्या व्यक्तिमत्वात आणि आत्मविश्वासात भर टाकतो. चेहऱ्यावर शीट मास्क लावणे आपल्याला कमी खर्चात फायदा देणारे ठरणार आहे.
शीट मास्क लावणे हे आपल्या स्किनकेअर रुटीनमधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे, जे केवळ घरीच स्पासारखा आरामदायी अनुभवच देत नाही, तर संपूर्ण पोषणही पुरवते. शीट मास्क त्वचेला हायड्रेशन, डिटॉक्सिफिकेशन आणि उजळपणा यांसारखे अनेक फायदे देतात. हे फेस शीट मास्क सीरममध्ये भिजवलेल्या कागदाच्या पातळ थरापासून बनवलेले असतात.
या मास्कमध्ये नैसर्गिक फळांचे अर्क आणि हायल्यूरॉनिक ॲसिड यांसारखे विविध घटक असतात, जे त्वचेला अनेक फायदे देतात. तुम्ही घरगुती कार्यक्रमात हे मास्क वापरू शकता.
चेहऱ्याला केमिकलपेक्षा नैसर्गिक घटक लावल्याने कधीही फायदाच होतो. हे एव्हरयुथ कंपनीची ही नॅचरल्स रिजुव्हेनेटिंग काकडी आणि कोरफड शीट मास्क आहेत. या शीट चेहऱ्याला लावल्याने झटपट आर्द्रता मिळते. तसेच, चेहऱ्यावरील पोर्स ओपन होऊन चेहऱ्यावर ग्लो येतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lakme ब्रँड ब्युटी प्रोडक्ट्समध्ये टॉपला गनला जातो. या ब्रँडचे सर्वच प्रोडक्ट महिला खरेदी करतात. तर आज आपण लॅक्मेच्या ब्लश अन् ग्लो शीट मास्कबद्दल बोलतोय. हा सुंदर पॅकींगमधील शीट मास्क स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे. या मास्कमध्ये १००% अस्सल फळांचा अर्क आहे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याला फळांच्या फेशियलसारखी चमक मिळते.
या मास्कच्या वापराने त्वचेला त्वरित आर्द्रता मिळते. चेहऱ्यावरील मृत त्वचेला ताजेपणा आणि पुनरुज्जीवन मिळते. उन्हाळ्यातील टॅनिंगही हा मास्क सहज हटवतो. याची किंमत ५५ रूपये आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कार्बामिड फोर्ट बायो कोलेजन मास्क हा चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. कोलेजन फेस मास्क शीट्समध्ये कमी आण्विक क्षमतेचे कोलेजन, नियासिनमाइड आणि हायल्यूरॉनिक ॲसिड असते, जे त्वचेत प्रभावीपणे खोलवर शिरून तिची लवचिकता, घट्टपणा आणि टवटवीतपणा परत आणते.
हा मास्त सतत वापरल्यामुळे कोलेजन नाईट रॅपिंग मास्क किंवा शीट मास्क वृद्धत्वाची सुरुवातीची चिन्हे कमी करण्यास मदत करतो. या मास्कमुळे चेहऱ्याला खोलवर हायड्रेशन, छिद्र कमी करणे, त्वचा घट्ट करणे आणि मॉइश्चरायझिंग मिळते. या मास्कची किंमत २७५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गार्निअर स्किन नॅचरल्सचा हा शीट मास्क आहे. जो चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतो. हा शीट मास्क, हायड्रेटिंग आणि चमक वाढवणारा मास्क आहे.
हा मास्क त्वचेला आर्द्रता देऊन गुळगुळीत करते आणि गुलाबी चमक देते. हा मास्क वापरण्यासाठी आपला चेहरा स्वच्छ धुवा, मास्क उघडा आणि चेहऱ्याच्या आकारानुसार व्यवस्थित बसवा. १५ मिनिटे तसाच ठेवा, मास्क काढून टाका आणि चेहऱ्यावर राहिलेल्या सीरमने हलक्या हाताने मसाज करा. याची किंमत ८३ रूपये आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सॅनफे इन्स्टंट डीपिगमेंटेशन व्हिटॅमिन सी फेशियल मास्क आहे. जो काळवंडलेल्या चेहऱ्याला चमकदार आणि तेजस्वी बनवतो. सॅनफे फेशियल शीट मास्क कोरियामध्ये १००% फळांचा अर्क वापरून डिझाइन आणि विकसित केले आहेत. पुरुष आणि महिला दोघांसाठीही उपयुक्त असलेले हे मास्क रातोरात परिणाम देतात आणि तुमच्या स्किनकेअर रुटीनमधील वेळ वाचविण्यात मदत करतात.
या मास्कमध्ये असलेली मऊ शीट लिंबू आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेच्या खोलवर पोहोचवते. लिंबाची साल हळुवारपणे स्क्रब करते आणि तुमची त्वचा निरोगी बनवते. १० मिनिटांनंतर त्वचा हायड्रेटेड दिसते. फक्त एका आठवड्यात त्वचा स्पष्टपणे चमकदार होते. या मास्कची किंमत ४१ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
काहीवेळा बाहेर जाताना आपल्याला पुरेसा वेळ नसतो त्यामुळे आपण चेहऱ्यासाठी काही करत नाही. मात्र, पार्लरमध्ये जाऊनही जो ग्लो चेहऱ्यावर येत नाही असा ग्लो तुम्ही मास्क वापरून मिळवू शकता.
काश्मिरीसारख्या मऊ मायक्रोफील शीट असलेला सौम्य फेशियल मास्क आहेत. हे निस्तेज त्वचेला उजळ करण्यास मदत करण्यासाठी व्हिटॅमिन सी डेरिव्हेटिव्ह आणि नियासिनमाइडने युक्त आहे. याची किंमत १४० रूपये आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हिमालय डार्क स्पॉट क्लिअरिंग टरमरिक फेस शीट मास्क आहे. हे सेंद्रिय पद्धतीने मिळवलेली हळदीचा मास्क आहे. हिमालय डार्क स्पॉट क्लिनिंग टरमरिक फेस शीट मास्क हे एक अद्वितीय मिश्रण आहे. ज्यात हळद आणि ज्येष्ठमध यांचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि फायटो-एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, जे काळे डाग आणि व्रण कमी करण्यास मदत करतात. या मास्कच्या नियमित वापराने तुम्हाला नक्कीच चेहऱ्यावर ग्लो मिळवता येईल. याची किंमत ६५ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्विस ब्यूटी केअर युथ-फुल कोलेजन बूस्ट मास्क आहे. हा २ तासांत काचेसारखी नितळ त्वचा देतो. स्विस ब्यूटी केअर युथ-फुल कोलेजन बूस्ट मास्क त्वचेला त्वरित आर्द्रता, पोषण आणि टवटवीतपणा देतो. एकदा पूर्णपणे शोषले जाऊन पारदर्शक झाल्यावर, चमकदार, काचेसारख्या नितळ त्वचेचा प्रभाव लक्षणीय असतो.
हा कोलेजन आणि १७ अमिनो ॲसिड्सचे गुणधर्म त्वचेची लवचिकता आणि संरक्षक शक्ती सुधारतात, बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला स्पष्टपणे उजळ करतात. याचा नाविन्यपूर्ण फॉर्म्युला त्वचेचा पोत कमी करतो आणि त्वचेला गुळगुळीत करतो, ज्यामुळे त्वचा बाळासारखी मऊ आणि कोमल बनते. या मास्कची किंमत १४१ इतकी आहे.
हा मास्क खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.