

कोणतीही बाईक चालवताना एक महत्त्वाचा नियम पाळावा लागतो तो म्हणजे हेल्मेट घालण्याचा. हेल्मेटशिवाय स्कूटी,बाईक चालवल्यास वाहतूक पोलीस तुम्हाला दंड आकारतील. हेल्मेट केवळ तुम्हाला दंडापासून वाचवत नाही, तर सुरक्षितही ठेवते. हेल्मेट घालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते रस्त्यावर तुमच्या बॉडीगार्डसारखे रक्षण करते.
हेल्मेटमध्ये ओपन-फेस हेल्मेट आणि फुल-फेस हेल्मेट असे दोन प्रकार आहेत. तुम्हीही ओपन फेस हेल्मेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याचा फायदे जाणून घ्या.
ओपन-फेस हेल्मेट तुमचा चेहरा मोकळा ठेवण्यासाठी डिझाइन केलेले असतात, ज्यामुळे श्वास घेणे आणि संवाद साधणे सोपे जाते. ते तुमच्या डोक्याच्या वरच्या भागाचे संरक्षण करतात. हे फुल-फेस हेल्मेट वजनाने हलके आणि घालण्यासाठी अधिक आरामदायक आहे.
ओपन-फेस हेल्मेट तुमचा चेहरा झाकत नाहीत. ते साधारणपणे फुल-फेस हेल्मेटपेक्षा वजनाने हलके असतात आणि त्यातून हवेचा प्रवाह अधिक चांगला होतो.
ओपन फेस हेल्मेटचा व्ह्यूइंग अँगल अधिक विस्तृत असतो, ज्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा परिसर अधिक सहजपणे पाहता येतो आणि ब्लाइंड स्पॉट्स (दृष्टीआडचे भाग) कमी होतात. यामुळे डोळ्यांवर ताणही येत नाही.
ओपन डिझाइनमुळे चेहऱ्यावर थेट हवा खेळती राहते, ज्यामुळे उन्हाळ्यात ते खूप आरामदायक वाटतात. तोंड झाकले जात नसल्यामुळे, तुम्ही इतर रायडर्स किंवा मागे बसलेल्या व्यक्तींशी सहजपणे बोलू शकता.
जे लोक चष्मा वापरतात त्यांच्यासाठी हे हेल्मेट अधिक आरामदायक असतात, कारण ते चेहऱ्यावर दाब टाकत नाहीत.
स्टड्स रे कंपनीचा हे स्टायलिश हेल्मेट आहे. हे आयएसआय प्रमाणित ओपन फेस हेल्मेट, पुरुष आणि महिलांसाठी वापरता येते. हे डी-रिंग लॉक असलेले हेल्मेट आहे. हे डोक्याच्या सर्वोत्तम संरक्षणासाठी आघात शोषून घेणारे लायनर आहे. या हेल्मेटमुळे त्वचेची जळजळ टाळते आणि प्रवासात तुम्हाला आरामदायी ठेवते. हे हेल्मेट घालणे आणि काढणे सोपे आहे. यामुळे प्रवास आरामदायक होतो. या हेल्मेटची किंमत ७६१ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्याची तरूणाई कुठलीही गोष्ट निवडताना आरामदायकपणा अन् स्टाईल या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देते. तसेच हे टीव्हीएस क्रूझटाउन ओपन फेस हेल्मेट आहे. हे स्टाईल आणि आरामदायकपणा दोन्ही देते. हे रायडर्ससाठी हाफ फेस हेल्मेट आहे. हे आयएसआय (ISI) आणि डीओटी (DOT) प्रमाणित हेल्मेट आहे.
यूव्ही-प्रतिरोधक पेंट असलेले उच्च-गुणवत्तेचे एबीएस शेल टिकाऊपणा आणि उत्कृष्ट आघात प्रतिरोधक क्षमता सुनिश्चित करते. शहरातील राइड्स आणि लांबच्या प्रवासासाठी बनवलेले एक हलके पण मजबूत हाफ-फेस हेल्मेट आहे. याची किंमत १,६९४ इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या फाईनपासून वाचण्यासाठी लोक रस्त्यावरही हेल्मेट खरेदी करतात. पण हे आपली सुरक्षा करण्यासाठी फायद्याचे नसते. कारण, कुठलेही हेल्मेट ISI प्रमाणित असावे लागते. तसे वेगा अॅटमचे हे हेल्मेट सुरक्षित आहे. स्मूथ मॅट फिनिश ओपन फेस हेल्मेट आहे. पुरुष आणि महिलांसाठी फायद्याचे आहे. हे सहजपणे लावण्यासाठी आणि काढण्यासाठी यात मेटॅलिक क्विक-रिलीज सायलेंट बकल आहे.
या हेल्मेटवर असलेली काच UV संरक्षण देते. हे दीर्घकाळच्या प्रवासात आरामासाठी अँटी-ॲलर्जेनिक, ओलावा शोषून घेणारे आहे. या हेल्मेटची किंमत ७७४ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्टील बर्ड SBH-23 ब्रुटल हे ISI प्रमाणित ओपन फेस हेल्मेट आहे. हे बॉटल ग्रीन रंगातील आहे जे तुम्हाला आर्मी लुक देते. या हेल्मेटला युरोपियन मानकांनुसार मायक्रो-मेट्रिक बकल आहे. या हेल्मेटमध्ये अधिक सुरक्षिततेसाठी एअर चॅनल्ससह मल्टी-लेयर ईपीएस आहे. यासोबत अँटी स्क्रॅच कोटेड वायझर, क्विक रिलीज वायझर मेकॅनिझम किट देखील आहे. हे हेल्मेट महिला आणि पुरूष दोघेही वापरू शकतात. याची किंमत ७७९ इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांची आवड लक्षात घेऊन हे हेल्मेट डिझाईन केले आहे. हे हेल्मेट Flora ISI & DOT कंपनीचे आहे. त्यावर फुले,पानांची नक्षीकाम केलेले आहे. हे हेल्मेट फ्लोरा आयएसआय आणि डीओटी (यूएसए) प्रमाणित आहे. हे महिलांसाठी खास तयार केलेले, पारदर्शक वायझरसह अत्यंत आरामदायक फिटींग देणारे हेल्मेट आहे. याची किंमत २,७५० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक स्कूटी, बाईकचा रंग हा सिल्वर असतो. महिला व्हाईटनंतर सिल्वर रंगाला पसंती देतात. तेव्हा O2 Open Face हे सुंदर हेल्मेट आहे जे सिल्वर रंगाचे आहे. हे O2 ओपन फेस / हाफ फेस हेल्मेट, युनिसेक्स, बाईकस्वार महिला आणि पुरुषांसाठी आहे. हे हेल्मेट ISI प्रमाणित आहे. यामध्ये पारदर्शक वायझर, स्मूथ फिनिश, हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाईन आहे. या हेल्मेटची किंमत ५७९ इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हे वेगा कंपनीचे हेल्मेट आहे जे काळ्या रंगातील आहे. त्यावर आकर्षक डिझाईनही आहे. हे हेल्मेट आयएसआय डीओटी प्रमाणित आहे ज्यामुळे आपल्याला सुरक्षेचा प्रश्न मिटतो. हे मॅट फिनिश ओपन फेस हेल्मेट आहे. जे पुरुष आणि महिलांसाठी वापरता येते. यामध्ये क्लिअर वायझरही आहे. याची किंमत १,०८३ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ECE, ISI आणि DOT सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रांसह असलेले हे रॉयल इनफिल्डचे हेल्मेट पुरेशी सुरक्षा देते. हे स्ट्रीट प्राईम बॉर्डर स्ट्राइप हेल्मेट तुमच्या साहसी प्रवासात तुम्हाला सुरक्षित ठेवेल. हे हेल्मेट दररोजच्या वापरासाठी उपयुक्त आहे. या हेल्मेटमध्ये कम्फर्ट लायनर आणि पॉलिस्टरचे आतील भाग आहेत. अधिक टिकाऊपणासाठी हेल्मेटचा रंगवलेला पृष्ठभाग आणि व्हायझरचा पृष्ठभाग दोन्ही UV ट्रीटेड आहेत. याची किंमत २,९०० इतकी आहे.
हे हेल्मेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.