टेनिसमधून उत्पन्न मिळवण्यात महिला टेनिसपटूंमध्ये सेरेना विलियम्स आणि तिची बहीण व्हिनस विलियम्स यांचा हात कोण धरत नाही.
सेरेना विलियम्स 2017 ला जगातील 100 सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये एकमेव महिला खेळाडू होती.
दोनच वर्षात सेरेना विलियम्स फोब्जच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचली. ती या यादीत 2022 पर्यंत अव्वल स्थानावर राहिली.
सेरेना विलियम्सची टेनिस कोर्टमार्फत मिळवलेली संपत्ती ही 700 कोटींच्या आसपास आहे. महिला टेनिसपटूंच्या कमाईत सेरेना अव्वल आहे तर दुसऱ्या स्थानावर तिची बहीण व्हिनस आहे. मात्र या दोघींमध्ये दुप्पटीचे अंतर आहे.
फोब्ज मासिकाने दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये सेरेना विलियम्सची एकूण संपत्ती ही 2000 कोटी रूपयांच्या वर आहे.
सेरेनाची स्वतःची सेरेना व्हेंच्युर्स नावाची कंपनी देखील आहे. याद्वारे ती जवळपास 60 स्टार्टअपमध्ये आपली गुंतवणूक करते.
सेरेनाने इतर खेळात देखील गुंतवणूक केली आहे. तिने UFC मध्ये जवळपास 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यातबरोबर तिचा मायामी डोल्फिन्समध्ये छोटासा मालकी हक्क देखील आहे.
सेरेनाने जगातील सर्वात मोठ्या मुलाखती घेणाऱ्या कॅरात (Karat) कंपनीत देखील आपली गुंतवणूक केली आहे. याद्वारे ती ब्रिलियंट ब्लॅक माईंड्स प्रोग्राम देखील चालवते. या उपक्रमाद्वारे कृष्णवर्णीय सॉफ्टवेअर इंजीनियर्सना नोकरी मिळवण्यासाठी मदत केली जाते.