अभिनेता सुयश टिळकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
तो पुन्हा एकदा मालिका जगतात आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेल्या 'लोकमान्य' या मालिकेत तो महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'वासुदेव बळवंत फडके' या क्रांतीकारकाच्या ऐतिहासिक भूमिकेत तो झळकणार आहे.
नुकताच त्याचा पहिला लुक समोर आला.
त्याच्या या लूकवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दर्शवले आहे.
या आधी तो 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेत दिसला होता.