Swara Bhaskar : मिले सुर मेरा तुम्हारा 'स्वरा भास्कर' भारत जोडोमध्ये

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये आहे.

Swara Bhaskar

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करनेही सहभाग घेतला.

Swara Bhaskar

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल आणि स्वरा एकत्र चालत असल्याचे फोटो शेअर करण्यात आले आहे.

Swara Bhaskar

फोटो शअर करताना कॅप्शनमध्ये "आज प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर भारत जोडो यात्रेचा एक भाग बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उपस्थितीमुळे ही यात्रा यशस्वी झाली आहे." असे नमुद करण्यात आले आहे.

Swara Bhaskar

स्वरा भास्कर बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे मत व्यक्त करत असते.

Swara Bhaskar

काश्मीर फाईलवरील वादामध्येदेखील स्वराने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर इस्रायलचे राजदूत नॉर गिलन यांचे ट्विट रिट्विट करत तिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Swara Bhaskar

भारत जोडो यात्रेत यापूर्वी अमोल पालेकर, संध्या गोखले, पूजा भट्ट, रिया सेन, सुशांत सिंग, मोना आंबेगावकर, रश्मी देसाई आणि आकांक्षा पुरी यांसारख्या सिनेसृष्टीतील व्यक्तींनी भाग घेतला होता.

Swara Bhaskar

काँग्रेसने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही यात्रा ४ डिसेंबरला मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये दाखल होणार आहे.

Swara Bhaskar

भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली असून, काश्मीरमध्ये तिचा शेवट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhaskar