अपूर्वा नेमळेकरच्या कृष्णलीला..

| Sakal

शेवंता हे नाव घराघरात पोहोचवणारी आणि शेवंता म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बरीच चर्चेत आहे.

| Sakal

अपूर्वाने या आधी नाटक, मालिका, सिनेमा यात बरेच काम केले आहे. परंतु 'रात्रीस खेळ चाले' या झी मराठीवरील मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.

| Sakal

अपूर्वाने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्ण अवतार धारण करून काही फोटो शेयर केले आहेत.

| Sakal

या फोटोमध्ये अपूर्वा ही साक्षात श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहे. ही अपूर्वाच आहे का याचाही आपल्याला विसर पडतो.

| Sakal

हातात वेणु घेऊन जणू कृष्ण समोर उभा आहे, अशा रूपात अपूर्वा चाहत्यांसमोर आली आहे. तिच्या या लुकवर चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

| Sakal

''ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे,'' असे अपूर्वाने कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.

| Sakal