आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर काजोलनं अधिराज्य गाजवलं आहे.
अभिनेत्री काजोल म्हणजे बोलका चेहरा,बोलके डोळे आणि यातनं लोकांशी थेट बोलणारा तिचा अभिनय.
तिनं सिनेमात आल्यावर तिचा पहिला सिनेमा फारसा चालला नसला मात्र त्यानंतर तिने खुप मेहनत घेतली आणि आज ती या स्थानावर पोहचली आहे.
'बाजीगर','दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे','कुछ कुछ होता है','करण अर्जुन','प्यार तो होना ही था' असे एकामागोमाग हीट सिनेमे तिनं दिले आहेत.
तिचा सुपरहीट सिनेमा 'कभी खुशी कभी गम' ला कोणी विसरुच शकणार नाही.
सिनेमातलं 'अंजली' हे नाव अजूनही चाहत्यांच्या मनात आहे.
तिला खरी प्रसिद्धी शाहरुख खानच्या बाजीगर या चित्रपटाने मिळाली.