अशी होती रंजना आणि अशोक मामांची लव्हस्टोरी..

| Sakal

७०-८० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेलं नाव म्हणजे रंजना आणि अशोक सराफ..

| Sakal

अचूक टायमिंग, उत्स्फूर्त शैली आणि दमदार अभिनय यामुळे हे दोनही कलाकार आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.

| Sakal

रंजना आणि अशोक सराफ यांनी अनेक सिनेमे एकत्र केले. बऱ्याचदा रंजना अभिनयात अशोकमामांना सरस ठरल्या, पण मामांनी त्याचेही कौतुक केले त्याला कारण होते त्यांच्यातील घट्ट मैत्री..

| Sakal

पण अशोक सराफ आणि रंजना यांच्यात मैत्री त्या पलीकडे होती. असं म्हणतात, त्यांच्यात प्रेम होतं,ते एकमेकांना पसंत करायचे इतकंच नाही तर आयुष्यात एकत्र पुढे जाण्याचा निर्णयही दोघांनी घेतला होता. परंतु अचानक काळानं केलेल्या आघातात रंजना यांचा अपघात आणि पुढे निधन झाले आणि दुर्दैवाने ही प्रेमकहाणी इथेच संपली.

| Sakal