दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
रश्मिकाचे लाखो चाहते आहेत. रश्मिका ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसते.
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सध्या रश्मिका ‘गुडबाय’ (Good Bye) या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशमनमध्ये व्यस्त आहे.
रश्मिका मंदाना सध्या मॅचिंग ब्लेझरसह गुलाबी चेक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
या चित्रपटात रश्मिकासोबत अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.