टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपन्यांचा फाउंडर म्हणून इलॉन मस्कला ओळखलं जातं.
इलॉनचे भारतीय लग्नातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तो शेरवानी घातलेला दिसत आहे.
यातील एका फोटोमध्ये मस्क चक्क शेरवानी घालून घोड्यावर बसलेला दिसत आहे. त्यामुळे त्याचं भारतात लग्न होतंय का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
हे फोटो खरंतर एआयची कमाल आहेत. रोलिंग कॅनव्हास या इन्स्टाग्राम हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
या फोटोंमध्ये इलॉन मस्क अगदी डॅशिंग दिसतो आहे. तो खरोखरच एखाद्या भारतीय लग्नात एंजॉय करत असल्याचं वाटत आहे.
हे फोटो एआयच्या मदतीने तयार केले असले, तरी अगदी खरे वाटत आहेत. यात इलॉन भारतीय लग्नात धमाल करताना दिसतोय.
इलॉन मस्क खऱ्या आयुष्यात मात्र एका कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिपमध्ये आहे. त्याचा तीन वेळा घटस्फोट झालेला आहे.
इलॉन मस्कला एकूण दहा मुलं आहेत. यामध्ये तिळे आणि जुळ्यांचा समावेश आहे. यांपैकी एका मुलाचा लहानपणी दुर्दैवी मृत्यू झाला होता.
इलॉन मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याची एकूण संपत्ती सध्या १९२.३ बिलियन डॉलर्स एवढी आहे.