एअरटेलच्या ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅनची किंमत ३३५९ रुपये आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा मिळेल.
कंपनीकडे ३६५ दिवसांचा देखील प्लॅन उपलब्ध आहे. २९९९ रुपये किंमतीच्या या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल.
एअरटेलकडे १,७९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध असून, यात ३६५ दिवसांसाठी एकूण २४ जीबी डेटा दिला जातो.
कंपनीकडे ८४ दिवसांच्या वैधतसह येणाऱ्या प्लॅनची किंमत ९९९ रुपये आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा मिळेल.
एअरटेलच्या ८३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळेल.
एअरटेलकडे ७७९ रुपयांचा प्लॅन असून, यात ९० दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा दिला जातो.
एअरटेलच्या या सर्व प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळेल.
तसेच, काही प्लॅन्समध्ये ओटीटी बेनिफिट्स देखील दिले जातात.