अक्षयनं मानधनात केली ४०% कपात, आता फी चा आकडा ...

| Sakal

अक्षय कुमार वर्षाला ४ ते ५ सिनेमे करतो. पण २०२२ हे साल मात्र त्याच्यासाठी फार काही चांगलं राहिलेलं नाही. त्याच्या सर्वच सिनेमांवर फ्लॉपचा शिक्का बसला.

| Sakal

पण असं असलं तरी त्यानं आपल्या सिनेमाचं मानधन तेवढंच घेतलेलं दिसलं. १०० ते १३५ करोड त्यानं २०२२ मधील आपल्या सिनेमांसाठी चार्ज केल्याचं समोर आलं आहे.

| Sakal

आता बातमी आहे की अक्षय कुमार आपल्या मानधनात ४० टक्के कपात करणार आहे.

| Sakal

अक्षयनं एका मुलाखतीत आपण आपलं मानधन कमी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं.

| Sakal

सध्या मंदीचा काळ आहे, मनोरंजनावर पैसे खर्च करताना लोक विचार करताना दिसत आहेत. त्यामुळे आता सिनेमावाल्यांनाच थोडं बदलायला हवं असं अक्षय म्हणाला.

| Sakal

अक्षयनं याच मुलाखतीत तो जास्त सिनेमे करण्यावरनं टीका होते यावर स्पष्ट भाष्य केले आहे.

| Sakal

आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले ते अक्षय मानधनात ४० टक्के कपात करणार म्हणजे किती करोड चार्ज करणार याकडे. सध्या तो आकडा समोर आलेला नाही.

| Sakal