गेल्या आठवड्यात 'हे' बॉलीवूडकर झाले ट्रोल..

| Sakal

पापाराझीला फोटोपोझ देताना आलिया रणबीरचे केस नीट करताना दिसली. तो व्हिडीओ व्हायरल झाला अन् लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. म्हणाले,'लोकांसमोर दाखवायला नवऱ्याची काळजी घेतेय'.

| Sakal

महाठग सुकेश चंद्रशेखर सोबत नाव जोडलं गेल्यानं निक्की तंबोली ट्रोल होतेय. निक्की सुकेशला तिहार जेलमध्ये भेटायला गेली होती,तसंच तिला महागड्या भेटवस्तूही दिल्याचं समोर आलंय.

| Sakal

एअरपोर्टवरचा निक्कीचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यावर खूप निगेटिव्ह कमेंट्स मिळाल्यात. कुणी म्हटलं,' तिहारहून आली वाटतं', तर कुणी लिहिलं,'तुझ्या हातातली पर्स सुकेशनेच दिलीय का?

| Sakal

रॉजर फेडररनं टेनिसमधून निवृत्ती जाहिर केली तेव्हा अनेकांनी भावूक पोस्ट आपल्या लाडक्या खेळाडूप्रती केल्या. दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही पोस्ट केली फक्त फोटो अरबाज खानचा वापरला.

| Sakal

आता एवढी मोठी चूक केल्यावर सोशल मीडियावरील ट्रोलर्सची गॅंग कशी सोडेल बरं मेहतांना. लोकांनी 'शेम ऑन हंसल,आणि मग म्हणता बॉलीवूडला बॉयकॉट का करता?' अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal

पलक तिवारी ट्रोल झाली ते तिनं घातलेल्या ड्रेसमध्ये कमालीची बारीक दिसल्यामुळे. कोणी तिला 'कुपोषित' म्हटलं,तर कुणी 'हाडांचा सापळा' म्हणून चिडवलं.

| Sakal

पलक तिवारी लवकरच सलमानच्या 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

| Sakal