महिला प्रीमियर लीग 2023 चा लिलाव संपल्यानंतर, अनेक महिला खेळाडूंच्या संपत्तीत पूर्णपणे बदल झाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 क्रिकेटर्सबद्दल सांगत आहोत, ज्या सर्वात श्रीमंत आहेत.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू महिला क्रिकेटर अॅलिस पेरी (Alice Perry) ही सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. तिच्या निव्वळ संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर तिच्याकडं $14 दशलक्ष (115 कोटी रुपये) पेक्षा जास्त संपत्ती आहे. पॅरीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 5000 हून अधिक धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेगिंग (Australian captain Meg Legging) दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती 9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच, 74 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मेगनं आतापर्यंत 8000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
या यादीत भारतीय कर्णधार मिताली राजचं (Mithali Raj) नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडं $ 5 दशलक्ष (41 कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. मितालीच्या नावावर 10 हजारहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत.
स्मृती मानधनानं (Smriti Mandhana) आतापर्यंत 6 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असून सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटूंमध्ये तिचं नाव चौथ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती 33 कोटींहून अधिक आहे.
हरमनप्रीत ही भारताची कर्णधार असून तिचं नावही या यादीत टॉप 5 मध्ये सामील आहे. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ते 3 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
इंग्लंडची क्रिकेटपटू सारा टेलरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 हून अधिक धावा केल्या आहेत. तिची एकूण संपत्ती 2 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
ऑस्ट्रेलियाची गोलंदाज हॉली फर्लिंगचं नावही टॉप 10 च्या यादीत सामील झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या नावावर केवळ 30 विकेट आहेत. तिची एकूण संपत्ती $1.5 दशलक्ष (12 कोटी) पेक्षा जास्त आहे.