अपूर्वा नेमळेकर म्हणजे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादळी व्यक्तिमत्त्व.
आज 99 दिवसांचा टप्पा पूर्ण करून ती विजयाच्या दारात उभी आहे.
या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली.
जे-जे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली.
तिने केवळ राडाच घातला नाही तर प्रेम, माया, मनोरंजन सगळं काही दाखवलं.
तिचा खेळ पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत.
प्रेक्षकांसोबतच बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनीही अपूर्वाच जिंकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे