Complicated Relationship: रिलेशनशिपमध्ये आहात? मग हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

रिलेशनशिपमध्ये विश्वास, समजुतदारपणा आणि प्रेम या तिन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. मात्र त्याआधी तुमचं रिलेशनशिप नेमकं कसं आहे तेही जाणून घेणे महत्वाचे ठरते.

जर तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर प्रेम आहे व त्याला तुमच्याशी लग्नही करायचे आहे पण तो घरच्यांना सांगू शकत नाहीये तेव्हा तुमचं रिलेशनशिप कॉम्प्लिकेटेड ठरू शकते.

अनेकदा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते. तुम्ही त्या व्यक्तीसोबत गप्पाही करता. मात्र तुमच्या मनातलं तुम्ही त्याला सांगू शकत नाही. अशा वेळीही तुमचं नातं गुंतलेलं असतं.

अनेकदा तुमचं मत तुम्ही पार्टनरला पटवून देऊ शकत नाही. याचाच अर्थ तुमचं नातं कॉम्प्लिकेटेड आहे.

जेव्हा दोन्ही पार्टनर त्यांच्यातील वाद मिटवत एकमेकांना समजूत घेतात त्याचा अर्थ असाच होतो की तुमचं रिलेशनशिप कॉम्प्लिकेटेड नसून सुरळीत चाललंय.

नात्यातील वाद सोडवत तुम्ही एकमेकांना समजून घेणे हीच खरी नात्याची ओळख आहे.

तेव्हा प्रत्येक नात्यात समजूतदारी असायलाच हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.