बाबांसाठी पडद्यामागून काम करणाऱ्या श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री

| Sakal

ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आहे.

| Sakal

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेतून त्यांनी अधिकृत एन्ट्री केली आहे.

| Sakal

श्रीजया यांचा आतापर्यंत राजकारणाशी थेट संपर्क नव्हता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडीलांच्या उद्योग व्यवसायात लक्षं दिलं.

| Sakal

देशात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना श्रीजया चव्हाण वडिलांच्या प्रचाराला मैदानात उतरल्या होत्या.

| Sakal

सर्वप्रथम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीजया यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. निवडणूक काळात श्रीजया यांनी अशोक चव्हाणांचा जनसंपर्क उत्तमरित्या सांभाळला.

| Sakal

श्रीजया उच्चविद्याभूषित आहेत. त्यांचं एलएलबी आणि एलएलएम कायदे विषयक शिक्षण पूर्ण झालं आहे. त्यांनी त्यांचे सर्व शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं.

| Sakal

भारत जोडो यात्रेतल्या एन्ट्रीनंतर श्रीजया आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करणार आहेत.

| Sakal